निवडणूक निरीक्षक सतीश कुमार एस यांनी घेतला महाड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा

निवडणूक निरीक्षक सतीश कुमार एस यांनी घेतला महाड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा

निवडणूक निरीक्षक सतीश कुमार एस यांनी घेतला महाड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड- निवडणूक निरीक्षक सतीश कुमार एस यांनी घेतला 194- महाड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आज आढावा घेतला. स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी करून भारत निवडणूक आयोगाच्या सूचना प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.श्री सतिश कुमार यांनी निवडणुकीचे नोंदणी कार्यालय, स्ट्रॉग रूम,एम.सी.सी, कंट्रोल रूम, साहित्य विभाग, सी.सी.टी.व्ही, आचारसंहिता कक्ष, कंट्रोल रूमची पाहणी केली. आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देशही त्यांनी दिले.

निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे स्ट्राँग रूमच्या सुरक्षेतेबाबत पोलीस पथकास सूचना दिल्या.तसेच मतमोजणी केंद्रास भेट देऊन आवश्यकतेनुसार सर्व बाबींची पूर्तता करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करणे गरजेचे आहे. विशेषतः विविध पथकांनी अत्यंत बारकाईने अधिक दक्षतापूर्वक कामकाज करावे असेही त्यांनी सांगितले.निवडणूक अनुषंगाने त्यांनी विविध कक्षास भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, नायब तहसीलदार भाबड आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here