‘विवाह’ चित्रपटाच्या कथेप्रमाणे, तरुणीने दाखवले हात तुटलेल्या तरुणाशी लग्न करण्याचे धाडस !

56

‘विवाह’ चित्रपटाच्या कथेप्रमाणे, तरुणीने दाखवले हात तुटलेल्या तरुणाशी लग्न करण्याचे धाडस !

बुलढाणा:- लग्न संस्थेमध्ये विवाह ठरवले जात असताना मुला-मुलींच्या पसंती बरोबरच मुलाचे उत्पन्न, संपत्ती, त्याचबरोबर मुलाचे उत्पन्नाचे साधन यांचादेखील तितकाच विचार केला जातो. या गोष्टी जुळून आल्या की विवाह जुळल्यातच जमा असतात असा लग्नाच्या बाबतीत सामाजिक नियम झाला आहे. मात्र सध्या एक अनोखा विवाह चर्चेत आहे लग्न ठरल्यानंतर हात तुटलेल्या तरुणासोबत लग्न करण्याचे धाडस दाखवून एका मुलीने समाजाला सकारात्मक संदेश दिला आहे. विवाह या हिंदी चित्रपटाची कथा आठवेल अशीच ही घटना आहे. यामध्ये फरक काय तो इतकाच की तिथे नायक आणि धाडस केले आणि ते खऱ्याखुऱ्या नायिकेने.

लग्न झाल्यानंतर हात तुटला असता तर स्वीकारले असते ना लोक चार हातांनी संसार उभा करतात आम्ही तीन हजार नि संसार उभा करू असे म्हणत तिने घरच्यांना समजावले आहे. चांदवड तालुका चिखली येथील विशाल इंगळे यांनी मंगरूळ नवघरे येथील प्रिया घेवंदे यांचे तीन महिन्यांपूर्वी लग्न जुळले होते. दोघेही वैवाहिक आयुष्याची स्वप्ने बघत होते. दोन्ही कुटुंबात लग्नाची तयारी सुरू होती अशाच एका महिन्याने अघटित घडले ट्रक चालक असलेल्या विशालचा देऊळगावमही जवळ भीषण अपघातात डावा हात ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडला गेला. त्याच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले मात्र पूर्णतः निकामी झाल्याने डावा हात कापावा लागला.

आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला होता एका हाताने वाहन कसे चालणार कमावण्याचा प्रश्न निर्माण झाला म्हटल्यावर लग्न तर मोडल आत जमा होते मात्र याच काळात वेगळीच कथा आकार घेत होते. प्रियाला विशालची ओढ लागली होती. तो उपचाराने बरा होईल आमचे लग्न होईल अशी स्वप्ने रंगवत होते. रोज विशाल ला फोन करून तब्येतीची विचारपूस करायचे मात्र हातच निकामी झाल्यामुळे विशालने काळजावर दगड ठेवून तिला सत्य परिस्थिती सांगितली विशाल ला आता वाहन चालवता येणार नसल्यामुळे त्यांच्या घरूनही या विवाहाला विरोध झाला होता त्याला कायमचे स्वीकारण्याची त्याला आयुष्यभराची साथ देण्याचा निर्धार केला.