राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे २( f) मान्यता

50

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे २( f) मान्यता

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे २( f) मान्यता
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे २( f) मान्यता

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : – मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी द्वारा संचालित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोग १९५६ कायद्याच्या कलम २( f ) अंतर्गत मान्यता प्राप्त झाली आहे.
महाविद्यालय हे गोंडवाना विद्यापीठाला सलग्नित असून मा. श्री. मनोजभाऊ वनमाळी, सचिव, म. शि. प्र. मं. आरमोरी यांच्या कुशल नेतृत्वात व मा. श्री. मयुरभाऊ वनमाळी, सदस्य, व संस्थेचे इतर पदाधिकारी म. शि. प्र. मं. आरमोरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेत परिसरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे .
महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमाचे तसेच आय आय टी जाम, स्पर्धा परीक्षा यासाठी नियमित मार्गदर्शन केले जाते. महाविद्यालय हे गोंडवाना विद्यापीठाचे एकमेव नवसंशोधन केंद्र म्हणून नावारूपास आलेले आहे. महाविद्यालयात पेटंट प्राप्त प्राध्यापकांचा समावेश आहे . महाविद्यालयातील विद्यार्थी हे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत नियमित स्थान प्राप्त करतात. महाविद्यालयातील विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणाकरिता आय. आय. टी. खडकपूर, एन. आय टी . जमशेदपूर व विविध राष्ट्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश प्राप्त करतात हेच महाविद्यालयाच्या शिक्षणाची फलश्रुती आहे .
२( f ) मान्यता प्राप्त झाल्याने विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे कोणतेही राष्ट्रीय चर्चासत्र, राष्ट्रीय परिषदा, परिसंवाद इ. आयोजन करण्याकरिता महाविद्यालय पात्र ठरलेले आहे तसेच विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
महाविद्यालयाला २( f ) प्राप्त झाल्याने सर्व स्थरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .