१० लाख रुपयांचे एलएडी टिव्ही लंपास करणाऱ्याला चोरट्यांना वडनेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
वडनेर पोलिसांनी दहा लाख एक हजार ४६६ रुपये किमतीचे एलईडी टीव्ही पळविणाऱ्या चोरट्यांना वडनेर पोलिस जेरबंद केले आहेअटक केलेल्या आरोपांची नावे सुभाष हरिभाऊ मोहर्ले रा. पिपरी ता. हिंगणघाट, भावेश गेंदालाल भोर रा. इंदोर मध्यप्रदेश व राजदीप दिलीप मंडलाई रा. उज्जैन मध्यप्रदेश अशी असुन पोलिसांनी त्यांच्याकडून ६ लाख ८० हजार ९५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.तर चोरट्यांचा एक साथिदार बल्लू उर्फ बलराज झांजा अद्या फरार आहे. एम. एच. ४० ए. के. ४३२९ क्रमांकाच्या मालवाहूतून सुभाष मोहर्ले, भावेश भोर, राजदीप मंडलाई तसेच अंतिम बल्लू ऊर्फ बलराज झांजा रा. घनिघाटी जि. देवास यांनी संगनमत करून महागडे • एलईडी टीव्ही लंपास केल्याचे लक्षात वडनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत तपासाला गती दिली. दरम्यान पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सुभाष मोहलें, भावेश भोर, राजदीप मंडलाई यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय आपल्या सोबत अंतीम बल्लू उर्फ बलराज झांजा हाही गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितले. पण सध्या तो फरार आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी ६.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई वडनेरचे ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अभिषेक बागडे, प्रेमचंद अवचट, आशीष डफ यांनी केली.