वर्धा जिल्ह्यात खुनासह इतर गंभीर गुन्ह्यातील 124 गुन्हेगार अद्यापही ‘वॉन्टेड’


वर्धा:- शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. पोलीस विभागाकडून अनेक प्रकरणांतील गुन्हेगारांना पकडून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. मात्र, खून, अत्याचार, जबरी चोरी आदींसह विविध गंभीर गुन्ह्यांतील तब्बल 124 आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होण्यात यशस्वी झाले आहे. गेल्या वर्षात जिल्ह्यातील तब्बल 124 आरोपी वॉन्टेड असल्याचे वर्धा पोलिसांच्या वेबसाईटवरून मिळालेल्या आकडेवारीनुसार लक्षात आले आहे.
पोलीस विभागातील तपास पथकांना हे आरोपी अजूनही मिळाले नसल्याचे दिसून येत आहे.  शहरात मागील काही वर्षात गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. वर्चस्ववादातून टोळीयुद्धाच्या अनेक घटना घडल्या. अनेकांच्या रक्ताने जिल्हा रक्ताळला. जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटकही केली. मात्र, अनेक आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वीही झाले. आणि ते आरोपी अजूनही पोलिसांना गवसले नसल्याची माहिती आहे.
वर्धा जिल्ह्यात खून प्रकरणात वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत 1, वर्धा 6, सेलू पोलीस ठाण्यांतर्गत 1, कारंजा 1, सिंदी रेल्वे 1, पुलगाव 2, आष्टी 1 तर समुद्रपूर पोलीस ठाण्यांतर्गत 1 अशा 14 खुनाच्या घटनांतील आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

तर सेवाग्राम आणि सिंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका आरोपीचा खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात शोध सुरू आहे. अत्याचार प्रकरणात 3 आरोपी वॉन्टेड आहेत. जबरी चोरीच्या प्रकरणातील 10 आरोपी अजूनही पोलिसांना गवसलेले नाहीत. घरफोडी प्रकरणातील 3 फसवणूक प्रकरणात 26 तर चोरीच्या प्रकरणातील 21 आरोपी पोलिसांना सापडलेले नसल्याची माहिती आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here