गाझियाबाद स्मशानभूमीत स्लॅब कोसळून 23 ठार.

50

गाझियाबाद स्मशानभूमीत स्लॅब कोसळून 23 ठार.

ढिगाऱ्याखाली अजूनही काही दबले असण्याची शक्यता आहे. त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत 23 मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले गेले आहेत

दिल्ली:- जवळच्या गाजियाबादमधील मुरादनगर भागात स्मशानात स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही दबले असण्याची शक्यता आहे. त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत 23 मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले गेले आहेत असं गाजियाबादचे पोलीस अधीक्षक अभिषेक वर्मा यांनी सांगितलं. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशऩ सुरू आहे. प्रशासनातील अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत.

गाझियाबादमधील डिफेन्स कॉलनी परिसरातील एका वृद्ध व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्या परिवारातील मंडळी स्माशानात जमली होती. अत्यंसंस्काराचा विधी सुरु असतानाच अचानक त्यांच्या अंगावर स्माशानाचं छत कोसळलं. सुमारे दोन डझन लोकं या छताखाली दबली गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली असून, लोकांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यास मदत करत आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे स्लॅब कोसळला आणि खाली उभे असलेले लोक त्याखाली अडकले. पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी हे लोक तिथे उभे होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताची माहिती घेतली असून, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आर्थिक मदत म्हणून जाहीर केली आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर योग्य उपचार होतील याकडे लक्ष देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.