अकोला रस्त्याने चालत असतानाच भीषण अपघात, ट्रकखाली चिरडून एकाने गमावला जीव.

अकोला :- अकोला शहरातील नेहरू पार्क चौकात शनिवारी रात्री आठच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रकच्या मागील चाकात आल्याने पदचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुरण बागडे असं अपघातात ठार झालेल्या 65 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक पुरण बागडे हे नेहरू पार्क चौकातून जात असताना समोर येणारा ट्रक त्यांच्या निदर्शनास आला नाही. ट्रकच्या अगदी जवळ आल्याने ट्रकच्या हुकमध्ये त्यांचा शर्ट अडकून ते ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. हा अपघात एवढा भीषण होता की मृतकांचा डोक्याच्या पूर्ण भाग बाहेर निघून रस्त्याला चिटकला होता.

अतिशय वर्दळीच्या या रस्तावर अपघात होताच काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतक इसमास अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठवले. रस्त्यावर मांसाचे तुकडे आणि रक्त सांडलेले पाहून वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी लगेच अग्निशामक दलाल बोलावून रस्तावर सांडलेले रक्त धुण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, या अपघातील ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here