सोशल मिडियावर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न.

सोशल मिडियावर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न.

मुंबई:- आज इंटरनेटवरच्या मध्यमातुन जग खुप जवळ आले आहे. पण माणुसकी खुप दुर गेली असल्याचे चित्र दिसून येते. इंटरनेटवरच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या प्रसिद्ध महिलांना बदनाम करण्यात येत असल्याचे समोर आल्याने देशात एकच खळबळ उडाली आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केलीये. त्याचबरोबर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

दिल्ली मधील एक प्रसिद्ध महिला पत्रकारने दिल्ली पुलिस जवळ जाऊन याबाबद तक्रार दिली आहे. bullibai.github.io या सोशल मिडिया अप्पवर मुस्लिम समाजाच्या शेकडो महिलांचे फोटो अपलोड करण्यात आल्याचा मामला आहे.

या अगोदर पण सुल्ली बाई अप्प (Sulli Bai app) आणि ‘सुल्ली डील्स’ (Sulli Deals) ला घेऊन विवाद उत्पन्न झाला होता. ‘सुल्ली’ किव्हा ‘सुल्ला’ मुस्लिम समाजासाठी वापरण्यात येणारा अपमानजनक शब्द आहे. असे मानण्यात येत आहे की, ‘बुल्ली’ त्याचेच एक बदलेले रूप रुप आहे. बुल्ली बाई ऐप सुली डील हे क्लोन सारखे वाटत आहे. सुल्ली डील या वेबसाइट वर महिलांची फोटो टाकुन ‘डील ऑफ द डे’ लिहण्यात आले आहे.

वेबसाइट वर टाकण्यात आले महिला पत्रकारची फोटो.

दिल्ली पुलिसामध्ये एक महिला पत्रकाराने शनिवारी अज्ञात व्यक्तिचा विरोधात तक्रार दाखल करुन आरोप लावला आहे की, मुस्लिम समाजाचा महिलाना बदनाम करुन त्यांचा अपमान करण्याच्या ऊद्देशाने त्याची फोटो एक वेबसाइट वर टाकण्यात आली. ज्यावर छेड़छाड़ करण्यात आली. महिला पत्रकारने दक्षिण दिल्ली मधील सीआर पार्क पोलीस स्टेशन मध्ये ऑनलाइन तक्रार दाखल केली त्याची प्रत त्यांनी आपल्या ट्विटर हैंडल वर टाकली आहे.

मुंबई साइबर पुलिसने आपत्तिजनक सामग्री आणि मुस्लिम समाजाच्या महिलाचा अपमान संबंधी चौकशी सुरु केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.