भरधाव ट्रकने सायकलस्वार कंत्राटी कामगारास चिरडले संतप्त नागरिकांनी तब्बल चार तास अडविली वाहतूक उपचार आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा कंपनी उचलणार खर्च

भरधाव ट्रकने सायकलस्वार कंत्राटी कामगारास चिरडले

संतप्त नागरिकांनी तब्बल चार तास अडविली वाहतूक

उपचार आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा कंपनी उचलणार खर्च

भरधाव ट्रकने सायकलस्वार कंत्राटी कामगारास चिरडले संतप्त नागरिकांनी तब्बल चार तास अडविली वाहतूक उपचार आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा कंपनी उचलणार खर्च
भरधाव ट्रकने सायकलस्वार कंत्राटी कामगारास चिरडले
संतप्त नागरिकांनी तब्बल चार तास अडविली वाहतूक
उपचार आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा कंपनी उचलणार खर्च

✍जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
9529811809

चंद्रपूर : कंपनी मध्ये काम न मिळाल्याने घरी परत येत असलेल्या एका 55 वर्षीय कंत्राटी कामगारास कोरपना तालुक्यातील नांदाफाटा जवळील रामनगर येथे आज रविवारी (2 जानेवारी 2022) ला सकाळच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या मालवाहू ट्रकने चिरडल्याची घटना घडली. मारुती गुलाब नवघडे (वय 55) असे गंभीर जखमी कामगाराचे नाव आहे. त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला चंद्रपूरला हलविण्यात आले. घटनेनंतर संतप्त झालेल्या कामगारांनी तब्बल चार तास वाहतुक रोखून धरली. सदर कामगारांचे उपचारासाठी होणारा खर्च व कुटुंबाचा उदरनिर्वाहाकरिता दरमहा मासिक मानधन देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केल्याने रोखून धरण्यात आलेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
कोरपना तालुक्यातील बीबी येथील रहिवासी मारुती गुलाब नवघडे (वय 55) अल्ट्राटेक कंपनी मध्ये कार्यरत आहे. आज रविवारी सकाळी तो कामावर गेला होता, मात्र कंपनीत आज काम न मिळाल्याने तो घरी परत येत होता. नांदा फाटा लगत असलेल्या रामनगर येथे भरधाव वेगात असलेल्या मालवाहू ट्रक क्रमांक एमएच ३४ एव्ही 2767 सीसीआर ने त्याला चिरडून टाकले. ट्रक उजव्या पायावरून गेल्याने त्याचे पाय निकामी झाले आहेत. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने प्रकृती अत्यवस्थ असल्याने चंद्रपूरला हलविण्यात आले.
एसीसी कंपनीचा सिमेंट बॅगने भरलेला एम एच ४० बी जी ३६८० क्रमांकाचा मिनीट्रक रामनगर बीबी येथील गडचांदूर आवारपूर या राज्यमार्गावर अवैधपणे रस्त्यावरच उभा असल्याने अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. गडचांदूर पोलिसांनी हा ट्रक जप्त केला असून या ट्रकचा चालक आकाश गवाले याचेकडे वाहन परवाना आढळून आलेला नाही. या मार्गावर भरधाव आणि जड वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून अपघात ही दैनंदिन बाब झाल्याने सदर घटनेनंतर घटनास्थळावर नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. त्यानंतर नागरिकांनी गडचांदूर वनोजा राज्य मार्गावरील वाहतूक रोखून धरली. तब्बल चार तास वाहतूक थांबल्याने या मार्गावर वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या माशांची प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
तब्बल चार तासांनी मध्यस्थीने निघाला तोडगा भरधाव ट्रकच्या अपघातात जखमी झालेला कंत्राटी कामगार हा घरचा कमविणारा एकुलता एक व्यक्ती आहे. तो गंभीर जखमी झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्याला कठीण जाणार आहे. चंद्रपुरात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याकरता बराच खर्च येणार आहे. तब्बल चार तास वाहतूक रोखून धरल्यानंतर सिसीआर लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीने त्याच्या उपचाराचा व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरीता मासिक मानधन देण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तब्बल चार तास वाहतूक ठप्प पडल्याने कंपनी व्यवस्थापनाने त्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. जखमी मारुती नवघडे याचे उपचाराकरिता येणारा खर्च घटनास्थळी रोख 50 हजार व दोन महिन्यांनी परत 50 हजार आणि बारा महिने प्रतिमाह 8 हजार या प्रमाणे सुमारे दोन लाख रुपये खर्च देण्याचे सीसीआर लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीने लेखी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. त्यांनंतर वाहतूक सुरळीत झाली.
रोडलगतचे पार्किंग वाहन हटविण्याची मागणी अंबुजाफाटा, गडचांदूर ते नांदाफाटा रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी वाहने उभी कधी जातात ठेवली जातात त्यामुळे दैनंदिन अपघाताच्या घटना घडतात अनेकांना जीव द्यावा लागतो तर काहींना जखमी झाल्याने कायमचे अपंगत्व प्राप्त होते हा सगळा प्रकार या राज्य महामार्गावर उभे राहणाऱ्या ट्रकच्या रहदारीमुळे घडत असतो असा आरोप कोण आहे नागरिकांकडून होत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने रोडलगत लावण्यात येणारे वाहने तातडीने हटवून रस्ता मोकळा करावा अशी मागणी होत आहे.