शेतात विद्युत प्रवाहीत करून ३ चितळांची शिकार; आरोपीस अटक

शेतात विद्युत प्रवाहीत करून ३ चितळांची शिकार; आरोपीस अटक

शेतात विद्युत प्रवाहीत करून ३ चितळांची शिकार; आरोपीस अटक
शेतात विद्युत प्रवाहीत करून ३ चितळांची शिकार; आरोपीस अटक

✍जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
9529811809

चंद्रपूर : शेतात विद्युत प्रवाहीत करून ३ चितळांची शिकार केल्याची घटना भद्रावती तालुक्यातील मांगली (रै.) येथे नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेत शेतमालक कवडू महादेव बोंढे (वय५०) यास अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मांगली (रै.) येथील शेतकरी कवडू महादेव बोंढे (५०) याने आपल्या सर्व्हे क्र. १५२ या शेतात विद्युत प्रवाह लावून ३० डिसेंबरच्या रात्री ३ चितळांची शिकार केली. त्यानंतर एका चितळाच्या पूर्ण मांसाची विल्हेवाट लावली. तर २ चितळांच्या काही मांसाची विल्हेवाट लावत असताना ही घटना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत झाली. त्यांनी घटनास्थळी येऊन सदर घटनेची चौकशी केली तेव्हा त्यांना चितळाचे मांस आढळून आले.
घटनास्थळाचा पंचनामा करून मृत चितळांचे शवविच्छेदन पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय रोडे यांनी केले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी कवडू बोंढे यास अटक करण्यात आली आहे.