नागपुर पिकअप व्हॅनचा भीषण अपघात, चार महिला जागीच ठार तर पाच महिला गंभीर जखमी.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442

नागपूर:- नववर्षाचा पहिल्याच सकाळी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाल्याची दुखद बातमी समोर आली आहे. या बोलेरो पिकअप व्हॅनच्या भीषण अपघातात चार महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिडिया वार्ता न्युजला प्राप्त झाली आहे. तर 5 मजुर महिला गंभीर रित्या जखमी झाल्या आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील ईसापुर-घुबडमेट रस्त्यावर आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या परिसरातील संत्र्याच्या बगिच्यात संत्री तोडण्यासाठी महिला मजूर एका बोलेरो पिकअप व्हॅनने जात होत्या. पहाटे चार वाजताच्या सुमारास बोलेरो वाहन चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. त्याच्यामध्ये चार जणींचा जागीच मृत्यू झाला.

मनीषा सलाम, मंजुळा उईके, कलाताई परतेती आणि मंजुला धुर्वे अशी मयत महिला मजुरांची नावं आहेत. इतर पाच जणींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.