पालांदूर येथील बारमध्ये बिलाचे पैसे देण्यावरून राडा बार मालक जखमी

पालांदूर येथील बारमध्ये बिलाचे पैसे देण्यावरून राडा

बार मालक जखमी

पालांदूर येथील बारमध्ये बिलाचे पैसे देण्यावरून राडा बार मालक जखमी
पालांदूर येथील बारमध्ये बिलाचे पैसे देण्यावरून राडा
बार मालक जखमी

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा. भंडारा
7620512045

लाखणी:-तालुक्यातील पालांदूर (चौ)येथील अड्याळ रस्त्यावरील एका बार मध्ये दुपारी ३ वा. दरम्यान पाच मद्यपी आणि बार व्यवस्थापक यांच्यात बिलाचे पैसे देण्यावरून हाणामारी झाली आहे. यात मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नात आलेले बार मालक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
नववर्षाची सुरुवात ही तळीरामांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नसतेच.अश्यातच काही तळीरामांनी पालांदूर येथील बारमध्ये घेतलेल्या मद्याच्या बिलाचे पैसे देण्यावरून बार मध्येच राडा घातला.
सुरुवातीला आपसी कारणावरून वादविवाद करून नंतर दारूच्या झालेल्या १४०० रुपयांचे बिलाचे ५०० रुपये देत बार व्यवस्थापक अमोल खंडाईत (३०) याला बाकी पैसे एटीएम मधून काढून आणतो असे सांगुन सर्व बाहेर निघाले.यावर अमोलने त्यांना विरोध करत असताना फक्त एक जण जाण्याचा आग्रह केला. मात्र,ते पाचही व्यक्ती बाहेर निघण्याचा प्रयत्न करत गेट पर्यंत पोहचले. या दरम्यान बार मालक भरत सू. खंडाईत (४८) हे व्यवस्थापकाने त्यांना भ्रमणध्वनीवरून कळविल्याप्रमाणे बार मध्ये पोहचले.
त्या पाच व्यक्तींमध्ये बार मधील कर्मचाऱ्यांसह आपसी वाद सुरू होता. या दरम्यान बार मालक खंडाईत यांनी चर्चा करून निर्णय घेऊ अशी भूमिका घेत विचार मांडत असता त्यातील एका मद्यपीने दुपट्यात दगड बांधून बार मालक भरत खंडाईत यांच्या डोक्यावर मारला.त्यात ते गंभीर जखमी झाले. सर्व प्रकार पाहता त्या मद्यपींनी घटनास्थळावरून पोबारा केला. लगेच बारच्या व्यवस्थापकाने पालांदुर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिल्यानंतर तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी नामे लाला कुंभरे (२५) व सुरज कुंभरे(२३) रा.भंडारा या दोघांसह इतर दोन अनोळखी आरोपींवर भा.द.वि. च्या कलम ३२३,३२४,५०४,५०६, ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून या हाणामारीत आरोपी असलेले दोन तरुण हे पालांदुर येथील तर दोघे अनोळखी भंडारा येथे राहणारे आहेत.पालांदुर पोलिसांनी दोघांना अटक केली असून बाकी दोघांची ओळख पटली असून शोध सुरू असल्याचे तपासी अधिकारी स.पो.नि.तेजस सावंत यांनी सांगितले.