बल्लारपूर येथील नाट्यगृहाचा नामकरण सोहळा संपन्न*नाट्यगृहाला गोंडराजे बल्लारशाह यांचं नाव

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
बल्लारपूर :-दिनांक 01जानेवारी 2022 नव्या वर्षाची नवी पहाट ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या बल्लारपूर शहराकरिता मानाची ठरली. माजी,अर्थ नियोजन व वन मंत्री, विकास पुरुष मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या भव्य अशा नाट्यगृहला ऐतिहासिक पार्श्वभूमी व राजेशाहीने गाजलेल्या,राजधानी म्हणून नावारूपास आलेल्या या राजधानीचे शेवटचे राजे गोंडराजे बल्लाळशा* यांच्या नावाने नामकरण वन विकास महामंडळाचे माजीअध्यक्ष मा. चंदनभैय्या चंदेल यांच्या हस्ते व नगराध्यक्ष,मा.हरीश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तसेच यावेळी नगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे धनादेश वितरीत करण्यात आले.याप्रसंगी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी संबोधित करताना ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या शहरातील नाट्यगृहला *गोंडराजे बल्लाळशाह* या नावाने नामकरण करताना अत्यानंद होत आहे.परंतु संभाव्य कोरोणाच्या तिसरा लाटेच्या कारणाने मोठेखानी कार्यक्रम करणे शक्य झाले नाही अशी खंत यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी नगरपालिकेचे उपाध्यक्ष सौ.मीनाताई चौधरी, मुख्याधिकारी श्री.विजय सरनाईक साहेब,नगरसेवक श्री.शिवचंद द्विवेदी,पाणी पुरवठा सभापती श्री.कमलेश शुक्ला,सौ.जयश्रीताई मोहुर्ले, सौ पुनमताई मोडक,सौ.आशाताई संगीडवार,महीला व बालकल्याण सभापती सौ.अम्कुबाई भुक्या,माजी नगराध्यक्ष सौ.छायाताई मडावीतसेच श्री.काशी नाथ सिंह,श्री.मेघनाथ सिंग,श्री.मनीष पांडे,श्री.देवेंद्र वाटकर,श्री.किशोर मोहुर्ले,श्री.चरनदासजी शेडमाके,श्री.संतोष आत्राम,श्रीमती मिनाक्षीताई गेडाम,श्रीमती तानाबाई मेश्राम,श्री.शंकर मडावि व मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.