निर्माणधीन इमारतीच्या बांधकामावर मजुराचा दुर्दैवी मृत्यू

✒क्रिष्णा वैद्य✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी: -शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरील ब्रम्हपुरी-नागभिड राष्ट्रीय महामार्गावरील तुमडीमेंढा येथील एका मोठ्या निर्माणाधिन बांधकामावर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अंगावर ग्रेनाईड फरशी पडून झालेल्या अपघातात एका मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची तर दोन जखमी झाल्याची घटना घडली.
ब्रम्हपुरी नागभिड राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच मौजा तुमडीमेंढा या गावी मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.सदर ची इमारत ही एका शाळेची असल्याची माहिती आहे.या निर्माणाधिन शाळेच्या इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाली असून आतील काही काम सुरू आहे. काल दि 1 ला दुपारी 5 च्या दरम्यान या शाळा बांधकामावर एका ट्रक मधून ग्रेनाईड च्या मोठ मोठ्या फरशा उतरवताना फरशी अंगावर पडून निळू केवलराम चहांदे वय 38 रा खरबी या मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पोलिस विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार घटनेचे नोंद करून काल दि 1 च्या रात्रो 10 वाजता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे शवविच्छेदन करण्यात येऊन रात्रीच प्रेत नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला.आज दी 2 ला मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आले.पुढील तपास पोलिस उपनीरीक्षक सुरेंद्र उपरे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here