ग्रामिण भागातील घरकुल योजनेतील निधी वाढवा
: अश्विन मेश्राम
वंचित बहुजन आघाड़ी

: अश्विन मेश्राम
वंचित बहुजन आघाड़ी
राजेश बारसागडे
तळोधी (बा.)अप्पर तालुका प्रतिनिधी
8830961332
तळोधी (बा.) :- अनेक वर्षापासुन कच्चा घरामध्ये वास्तव्य करीत जीवन कंठत असताना ज्यांना राहण्याची व्यवस्था नाही. आणि आर्थिक अडचणीचा सामना करताना उदरनिर्वाह करीत असलेल्या अशा कुंटुबांना पक्क घर तयार करण्यासाठी सरकार ग्रामीण भागात ग्रामपंचायतच्या माध्यमातुन शबरी,पंतप्रधान आवास,रमाई योजने अतंर्गत जवळपास दिड लाख रुपयांचा निधि देत आहे.ज्यामध्ये संडास , घर बांधकाम करायचे आहे परंतु
घर बांधकाम करण्यासाठी लागणा-या सिमेंट,सलाख,रेती, गिट्टी, इतर साधनाच्या भाव वाढीस गेल्यामुळे जनता त्रस्त झालेली आहे.बांधकाम करणा-या कारागीरांची सुद्धा रोजी वाढलेली आहे.अशा परीस्थितीमध्ये मिळणा-या घरकुल योजनेतील निधीमध्ये पुर्ण घर बांधकाम होऊ शकत नाही. आणि केंद्र व राज्य सरकारच्या निकषानुसार भुकंप रहीत घर बांधकाम करायला सांगित सरकार ग्रामीण भागातील लाभार्थ्याची एकप्रकारची थट्टा करीत आहे.एकीकडे टँक्स अधिक मिळतो म्हणुन नगरपरिषद भागामध्ये अडीच लाख निधी तर ग्रामिण भागात केवळ दिड लाख रुपये निधी मिळत आहे. पंरतु ग्रामिण भागातील सुध्दा जनता याच देशातील असुन ती सुध्दा टँक्स भरते आहे.हे सरकारने लक्षात घेतले पाहीजे. ज्या मध्ये एक लाखाची तफावत आहे ती तफावत सरकार दुर न करता ग्रामिण भागातील जनतेवर अन्याय करीत आहे.
ग्रामीण आणि नगरपरिषद अतंर्गत येणा-या परीसरातील घरकुल लाभार्थ्यांना एकाच किमंती मध्ये घर बांधकामासाठी लागणा-या वस्तुची खरेदी करावी लागत आहे.ज्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यी एवढ्या कमी रकमेमध्ये घर बांधकाम कसे करावे. या चिंतेत असुन मात्र सरकार ग्रामीण भागातील सर्वसामान्य घरकुल लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे.
ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थी व गावातील जनतेने शबरी,पंतप्रधान आवास,रमाई योजने अतंर्गत मिळणा-या घरकुल निधीमध्ये वाढ करण्याबाबत ठराव सरपंच युनियनने ग्रामपंचायत ला घेण्यासाठी लावावा आणि ग्रामपंचायतने गावातील जनतेला सहकार्य करीत जनतेच्या हिताचा विचार करून तो ठराव तहसिदार यांच्या मार्फत सरकारला निवेदनाद्वारे पाठवावे.
सरकार ने गरीब जनतेचा विचार करून घरकुल बांधकामा करीता असणा-या योजनेतील निधी वाढवावा जेनेकरुन सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल असे आवाहन वंचित बहुजन आघाड़ी चे चंद्रपूर जिल्हा सचिव अश्विन मेश्राम यांनी केले आहे.