मऱ्हेगाव(जुना) येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

मऱ्हेगाव(जुना) येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

मऱ्हेगाव(जुना) येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
मऱ्हेगाव(जुना) येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045

लाखणी:-तालुक्यातील मऱ्हेगाव (जुना)येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळा मऱ्हेगाव तसेच सावित्रीबाई फुले महिला भजनी मंडळ मऱ्हेगाव (जुना) यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

ह्या प्रसंगी ग्रामस्वच्छता करण्यात येऊन प्रभातफेरी काढण्यात आली.यातच सामाजिक बांधिलकी जपत जि.प.शाळा मऱ्हेगावच्या वतीने सावित्रीच्या लेकी या उपक्रमांतर्गत सन १९२०-२१ या शैक्षणिक सत्रात इयत्ता बारावी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या
कू.हर्षलता अनिल बेंदवार व इयत्ता दहावीतुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु.जूही मोतीराम राऊत या विद्यार्थिनींना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
ह्या कार्यक्रम प्रसंगीप्रमूख मार्गदर्शक म्हणुन सामाजिक कार्यकर्ते वसंतराव शेळके,पालांदुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार तेजस सावंत,युवराज खोबरागडे,जय राठोड यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रा.पं. मऱ्हेगावच्या सरपंचा देवकन बेंदवार यांनी भूषवित ग्राम पंचायतचे उपसरपंच राघोजी फुल्लुके यांनी सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्याबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन ओमेंद्र तरोने यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच देवकन बेंदवार,उपसरपंच आर.सी. फुल्लूके,विलास शेंडे,ओमेन्द्र तरोने, तुलाराम राऊत यांचेसह तंटामुक्त समिती अध्यक्ष भास्कर मदनकर,माजी सरपंच शामराव बेंदवार,चंद्रभान बेंदवार,देवराम फुल्लुके,पुरुषोत्तम दृगकर,वासुदेव सिंग,सतीश वासनिक, ज्ञानेश्वर कळंबे, वनिता शेंडे,धनश्री शेंडे,योगिता तरोने, सरस्वता मेश्राम, कविता बेंदवार,सविता बेंदवार, प्रमिला बेंदवार,हेमू बेंदवार,सीमा तरोने,वैशाली शेंडे,विमल ब्राह्मणकर आदींनी विशेष सहकार्य केले.