satypal-singh-criticizes-modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी घमेंडी आहेत, मेघालयचे राज्यपाल सत्य पाल सिंग यांनी केला आरोप

शेतकरी माझ्यासाठी मेले आहेत का? शेतकरी आंदोलनादरम्यान निधन झालेल्या शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधान मोदींचे उद्धट उदगार.

satypal-singh-criticizes-modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी घमेंडी आहेत, मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी केला आरोप

सिद्धांत
३ जानेवारी २०२२: मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी हरिणामधील दादरी येथे बोलताना सांगितले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे “खूप घमेंडी” आहेत. वादग्रत कृषी कायद्यांच्या बाबतीत चर्चा करत असताना माझा त्यांच्याशी वादविवाद झाला.

घटनेचे वर्णन करताना सत्यपाल मलीक म्हणाले, “ते फार घमेंडी आहेत. मी जेंव्हा त्यांना (पंतप्रधानांना) सांगितले कि आपल्या ५०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे आणि एखादा कुत्रा मरतो, तेंव्हा तुम्ही श्रद्धांजलीचे पत्र पाठवता. त्यावेळी पंतप्रधानांनी मला विचारले ” ते माझ्यासाठी मेले आहेत का?” मलिक त्यांना उत्तर देत पुढे म्हणाले ” मी त्यांना म्हणालो होय, तुम्हीच तर मुख्य आहात (देशाचे). माझा अखेर त्यांच्याशी वादविवाद झाला. त्यांनी मला अमित शहाना भेटण्यास सांगितले.
मी अमित शहांना भेटलो, ” शहांनी मला सांगितले कि काळजी करू नका, प्रयत्न चालू ठेवा”. सत्यपाल मलीक पुढे म्हणाले. 

ह्या पूर्ण घटनेबद्दल मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलीक नक्की काय म्हणाले, बघा त्यांच्या या व्हिडिओमध्ये.

-सत्यपाल मालिकांच्या मते अमित शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याबद्दल केलेलं वादग्रस्त विधान- 

 

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलीक कृषी कायद्याविरोधात आंदोलनाच्या वेळी अटक झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयीसुद्धा बोलताना म्हणले कि केंद्र सरकारला प्रामाणिकपणे आपली चूक कबूल करून या शेतकऱ्यांवरील सारे गुन्हे मागे घेण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारला वाटत असेल कि, शेतकऱ्यांचे आंदोलन संपले आहे. परंतु नव्या कृषी कायद्यांअंतर्गत शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास शेतकरी पुन्हा आंदोलन सुरु करतील.

मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीतच सत्यपाल मलीक यांची मेघालायच्या राज्यपाल पदी निवड करण्यात आली होती. त्याआधी त्यांनी गोवा आणि जम्मू काश्मीर या राज्यांचे राज्यपाल पद सांभाळले होते.

सत्यपाल मलीक यांनी या आधीही केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. वादग्रस्त कृषी कायदे मागे न घेतल्यास राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याचे ही काही महिन्यांपूर्वी त्यांनी जाहीर केले होते. तसेच पंतप्रधान मोदींनी स्वतः पुढाकार घेऊन चालवलेल्या सेंट्रल व्हिस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट वरून ही त्यांनी सुनावले होते. अश्या प्रोजेक्टवर खर्च करण्यापेक्षा जागतिक दर्जाचे कॉलेज बांधणे योग्य ठरले असते, अश्या शब्दात त्यांनी मोदींच्या सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टवर टीका केली होती.

पण यावेळी थेट पंतप्रधानांच्या स्वभावरून केलेल्या विधानांची देशभरात चांगलीच चर्चा रंगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here