स्त्री शिक्षनाचे प्रणेते सावित्रीबाई फुले यांना घुग्घूस काँग्रेस तर्फे आदरांजली अर्पित
.. 🖋️साहिल सैय्यद /प्रतिनिधि
📲9307948197
घुग्घूस : भारतातील स्त्री शिक्षणाचं प्रणेते
महान समाजसुधारक शिक्षणतज्य कवियित्री ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित
घुग्घूस शहर काँग्रेस येथे महिला काँग्रेसच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना आदरांजली अर्पित करून त्यांच्या जीवन कार्याला उजळणी दिली.
सावित्रीबाई या स्त्री शिक्षणाच्या प्रणेते असून त्यांनी आपले पती ज्योतीराव फुले यांच्या कडून शिक्षण घेऊन 01 जानेवारी 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा शुरु केली
आज देशातील महिला सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री जज डॉक्टर अश्या अनेक महत्वाचे पद भूषवीत आहे यासाठी सावित्रीबाईना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले अपमान अन्याय सहन करावे लागले आज संपूर्ण महाराष्ट्रात सावित्रीबाईचा जन्मदिवस बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
या जयंती कार्यक्रमा प्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, महिला शहर अध्यक्ष संगीता बोबडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, शहर कार्याध्यक्ष दीप्ती सोनटक्के, सुजाता सोनटक्के, वैशाली दुर्योधन, निलिमा वाघमारे,भारती निमसटकर, काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, सुनील पाटील,शहशाह शेख, चंदन दत्ता, अफसर अली, अंकुश सपाटे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते