मेकअप करण्यापूर्वी

94

दिवसा कडक ऊन आणि संध्याकाळपासून कडाक्याची थंडी असं काहीसं विचित्र वातावरण सध्या अनुभवायला मिळतंय. ऊन्हाच्या तुलनेत थंडीचा कडाका जरा अधिक असल्याने या दिवसात त्वचा कोरडी आणि शुष्क होते. म्हणूनच मेकअप करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. त्या विषयी…
दिवसा बाहेर पडणार असाल तर चेहऱ्यावर अतिशय हलका मेकअप करा. मेकअप करण्यापूर्वी त्वचा स्वच्छ असणं गरजेचं आहे. त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी तुमच्या त्वचेला सूट होणारा फेसवॉश किंवा क्लीनजरनं चेहरा स्वच्छ करून घ्या. कोमट पाण्याने चेहरा धुतल्यानंतर तो व्यवस्थित कोरडा करा.
मेकअपसाठी लागणारं साहित्य मान्यताप्राप्त कंपन्यांचंच वापरा. मेकअप साहित्याची अलर्जी असेल तर ते कोणत्याही कारणास्तव ते वापरू नका. त्याने त्वचेवर दीर्घकाळ इन्फेक्शनसारखा विकार जडू शकतो.