15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 17 जणांकडून सलग पाच महिने बलात्कार.

65

15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 17 जणांकडून सलग पाच महिने बलात्कार.

v A 15-year-old girl was raped by 17 men for five consecutive months.

कर्नाटक:– 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या पाच महिन्यांपासून बलात्कार, लैंगिक अत्याचार तसंच तस्करी केल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपींमध्ये मुलीच्या मावशीचाही समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. जिल्हा बालकल्याण समिती सभापतींनी 30 जानेवारीला पोलीस ठाण्यात 17 जणांविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, “15 वर्षांच्या मुलीवर पाच महिने 17 जणांकडून बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले. मुलीची मावशी यामधील मुख्य आरोपी आहे”. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दगड फोडणाऱ्या युनिटमध्ये काम करत असताना गिरीश नावाच्या एका बसचालकासोबत ओळख झाली. त्याने तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले. “गिरीशने तिचा नंबर अभी नावाच्या आरोपीला दिला. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. अभीने पीडितेचे फोटो, व्हिडीओ काढले आणि ब्लॅकमेल केलं. नंतर त्याच्या मित्रांनीही पीडितेवर बलात्कार केला,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तीन वर्षापूर्वी आईचा मृत्यू झाल्यानंतर मावशीसोबत राहत होती. मुलीवर वारंवार होणाऱ्या बलात्काराबद्दल तिला माहिती होतं. पोलिसांनी तिलाही अटक केली आहे.