A young woman from Pune cheated 16 young men in her trap; Looted loot worth over Rs 15 lakh.

पुण्यातील तरुणीने तब्बल 16 तरुणांना फसवलं आपल्या जाळ्यात; 15 लाखांहून अधिक किंमतीचा लुटला ऐवज.

पुणे:-  पुण्यातील एका 27 वर्षीय तरुणीने एक दोन नव्हे तर तब्बल 16 तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायली काळे असं या आरोपी तरूणीचं नाव असून ती पुण्यातील साधु वासवाणी रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. सायलीने डेटींग अ‍ॅपद्वारे तिने तब्बल 16 तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्याकडील सोनं लंपास केलं. ज्यामध्ये सोन्याच्या चैन, अंगठ्या आणि महागड्या मोबाईलचा समावेश होता. सुमारे 15 लाखांहून अधिक किंमतीचा हा ऐवज होता.

लुटल्या गेलेल्या एका तरुणाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली आणि हा प्रकार उघडकीस आला. तरुणाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणीला पकडण्यासाठी स्मार्ट गेम खेळला आणि ती त्यांच्या जाळ्यात अडकली. पोलिसांनी तिने लुटलेला सर्व ऐवज जप्त केला आहे. त्याचबरोबर सायलीने ज्या 16 तरुणांना फसवलं त्यापैकी फक्त 4 जणांनीच तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. इतर तरुण बेअब्रू होतील या भीतीने अद्यापही पोलिसांकडे तक्रार द्यायला गेले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here