Disability agitation for various demands in front of Wardha Collectorate.
Disability agitation for various demands in front of Wardha Collectorate.

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या करिता अपंगाचे आंदोलन.

Disability agitation for various demands in front of Wardha Collectorate.
Disability agitation for various demands in front of Wardha Collectorate.

आशीष अंबादे प्रतीनिधी
वर्धा:- जिल्हातील अपंग जनता दलाच्या वतीने जिल्हातील अपंग लोकांच्या विविध समस्या आणी मागण्याकरीता मंगळवार 2 फेब्रुवारीला वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी आंदोलन करण्यात आले. आपल्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

राज्य सरकारने अपंग दिव्यांगाच्या विकासाकरीता अनेक योजना राबवल्या जात आहे. या योजनेबाबत शासनाद्वारा निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. पण वर्धा जिल्हातील हिंगणघाट, देवळी, पुलगाव, आष्ठी, वर्धा, आर्वी, समुद्रपुर, सिंधी रेल्वे तालूक्यातील प्रशासनाच्या हेकेखोर आणी गलथान कारभारामुळे आज संपुर्ण वर्धा जिल्हातील अपंग हे शासनाच्या विविध योजनेच्या आणी सवलतीचा लाभ यांना मीळत नाही आहे. आज मोठ्या प्रमाणात बोगस अपंग पण यांचा लाभ घेत असल्यामुळे खरे अपंग लाभा पासुण वंचित असल्याचे दिसुन येत आहे. अशा बोगस अपंगची युडीआयडी प्रमाणे तपासणी करुन त्यांच्यावर शासनाने करवाई करावी. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्गदर्शन केंद्राकरिता जागा उपलब्ध करुन द्यावी. अपंगांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दर महीन्यात देण्यात यावे. शासन निर्णयाप्रमाणे अपंगांना स्वतंत्र राशन कार्ड व अंत्योदय योजनेत समावेश करण्यात यावे. शासन निर्णयाप्रमाणे अपंगांना स्वयंरोजगाराकरिता 200 स्केअर फुट जागा देण्यात यावी. अपंग कल्याण पुनर्वसन निधी 5 टक्केप्रमाणे सक्तीने खर्च करण्यात यावा. अपंगांना वीनाअट घरकुल आणी अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात यावा आदी मागण्या निवेदनातुन करण्यात आल्या.
या आंदोलनात अपंग जनता दलाचे जिल्हाध्यक्ष भास्कर लांढे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा संगीता हिवसे, रोशन तुरणकर, करुणा कुंभारी, रजनी लोखंडे, रामेश्वर बालपांडे, वर्षा नरड, सुरेश कोकाटे, लक्ष्मण गोटे, प्रकाश शंभरकर, सुनील चतुर, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here