Wardha Uttam Galwa company files chargesheet in blast case.
Wardha Uttam Galwa company files chargesheet in blast case.

वर्ध्यातील भुगाव कंपनीत स्फोट, 30 पेक्षा अधिक मजूर भाजल्याचा अंदाज.

भुगाव येथील उत्तम गाल्वा यांच्या स्टील कंपनीत भीषण स्फोट झाल्याने अनेक मजदूर जखमी झाले असल्याची बातमी समोर येत आहे.

 Explosion at Bhugaon company in Wardha, estimated to have burnt more than 30 workers.
Explosion at Bhugaon company in Wardha, estimated to have burnt more than 30 workers.

मुकेश चौधरी प्रतिनिधी
वर्धा:- भूगाव येथे असलेल्या उत्तम गाल्वा मेटॅलिक कंपनी. या केमिकल फॅक्टरीत बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास स्फोट होऊन 30 पेक्षा अधिक मजूर भाजल्याची घटना घडली आहे. या स्फोटामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान सर्व जखमी मजुरांना सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी फॅक्टरीच्या गेटसमोर पत्रकारांना रोखून धरण्यात आले तर एका इलेक्ट्रॉनिक मिडिया पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आली आहे.  घटनास्थळी सावंगी पोलिस ठाण्याचे ठाणेदार रेवचंद शिंगांनजुडे आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले आहे. ब्लास्ट फर्निशचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उत्तम गलवा कंपनीत झालेल्या स्फोटाची चौकशी कामगार अधिकऱ्यांमार्फत होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी निर्गमित केली आहे. चौकशी अंती दोषींवर कारवाई प्रस्तावित होईल असे घटनास्थळाची पाहणी केल्या नंतर जिल्हाधिकारी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले,

 Explosion at Bhugaon company in Wardha, estimated to have burnt more than 30 workers.
वर्धा जिल्हाचे खासदार रामदास तडस दिल्ली येथे असल्याने कंपनी व्यवस्थापन, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या कडून सदर घटनेची सर्व माहिती घेतली आणि जखमींवर चांगले उपचार करावे काळजी घ्यावी आणि सदर घटनेची व्यवस्थित शहानिशा करावी. तसेच भुगाव कंपनी व्यवस्थापका सोबत सुद्धा चर्चा करून जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च कंपनी मार्फत चांगल्या रुग्णालयात करावा आणि जखमींच्या घरच्यांना मदत करावी असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here