भावांनी प्रियकराच्या मदतीने बहिणीचा काढला काटा.

50

भावांनी प्रियकराच्या मदतीने बहिणीचा काढला काटा.

 The brothers removed the sister's fork with the help of their boyfriend.

देवरिया:- बहिणीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून भावांनीच तिचा काटा काढल्याची घटना समोर आली आहे. याकामी आरोपी भावांनी बहिणीच्या जुन्या प्रियकराचीही मदत घेतली. हत्याकांडाचा हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्ह्यात घडला आहे.

देवरिया जिल्ह्यातील गौरिबाजार पोलीस स्थानक भागात येणाऱ्या हरेरामपूर येथे पश्चिम रेल्वे क्रॉसिंग पुलाखाली पोलिसांना एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. सौचाला जात असताना ट्रेनने उडवल्याने तरुणीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर व्यक्त केला होता. मात्र अधिक तपासानंतर सत्य समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. मृत तरुणीची तिच्या भावांनीच हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी रेशम हिचे आजूबाजूच्या गावातील काही तरुणांशी अनैतिक संबंध होते. समाजात चर्चा होऊ लागल्याने भाऊ अरमान याने तिला अनेकदा याबाबत समजावलेही, मात्र ती ऐकण्याचा मनस्थितीत नव्हती. अखेर लोकलाजेखातर सख्ख्या भावाने बहिणीच्या हत्येचा कट रचला. याकामी त्याने काकांचा मुलगा सैफ आणि बहिणीचा आधीचा प्रियकर शिवम यालाही सोबत घेतले.

कट रचल्यानंतर शिवम याने रेशमला फोन करुन बाहेर भेटायला बोलावले आणि आपण पळून जाऊया असे सांगितले. जेव्हा ती त्याला भेटायला गेली, तेव्हा तिथे आधीपासूनच उपस्थित भावांनी तिच्यावर चाकूने सपासप वार केला. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रेशमला टाकून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, भावांनीच जुन्या प्रियकराच्या मदतीने मिळून बहिणीची हत्या केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली आणि तिन्ही आरोपींना अटक केली. मुख्य आरोपी अरमान याने गुन्हा कबूल केला असून पोलीस चौकशीदरम्यान सांगितले की, बहिणीचे अनेक तरुणांसोबत अनैतिक संबंध होते. याच रागातून तिचा आधीचा प्रियकर शिवम याच्या मदतीने तिला भेटायला बोलावले आणि तिची हत्या केली.