“आम्ही शेतकरी आहोत, गरज पडली तर लाथ मारु तेथे पाणी काढू”

54

“आम्ही शेतकरी आहोत, गरज पडली तर लाथ मारु तेथे पाणी काढू”

 "We are farmers, if need be, we will kick and draw water there."
नवी दिल्ली:- कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची सरकार चांगलीच कोंडी करत आहे. सीमा भागातील रस्त्यावर कॉक्रिटचे पक्के अडथळे उभारुण रस्ते बंद करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

आम्ही शेतकरी आहोत. गरज पडली तर लाथ मारु तेथे पाणी काढू, या परिस्थीतीला घाबरुन जाऊ असा सरकारनं गैरसमज करु नये. आम्ही इथून माघारी जाणार नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. सरकारनं गाजीपूर सीमा तसंच दिल्ली आणि हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्याच्या उद्देशानं या भागात तारेचं कुंपण बांधलं आहे. दरम्यान, नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेेल्या अडीच महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. तरीदेखील सरकारनं यावर कोणताच तोडगा काढलेला नाही.