कोर्धा येथील हनुमान देवस्थानचे बांधकाम करिता मा.बंटीभाऊ भांगडीया यांचे कडून आर्थिक मदत.
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभीड- तालुक्यात मौजा-कोर्धा येथील गावकऱ्यांना हनुमान मंदिराचे बांधकाम करणे करिता आर्थिक अडचण भासत असल्याने आर्थिक मदतीची आवश्यकता होती त्यामुळे ग्रामस्थांनी मा.आमदार साहेबांना सदर हनुमान मंदिराचे बांधकाम पूर्ण करणे करीता गावातील भाजपा पदाधिकारी मार्फत आर्थिक मदतीची मांगणी केली होती.
तेव्हा राष्ट्रसंताच्या विचारावर चालणारे मा.बंटीभाऊ भांगडीया यांनी गावकरी व भाजपा पदाधिकारी यांच्या शब्दाची जाणीव करत श्री.संतोष भाऊ रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड यांच्या हस्ते मा.आमदार साहेबांनी कोर्धा येथील ग्रामस्थांना हनुमान मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 50,000/- रुपयांची आर्थिक मदत दिली. व गावकऱ्यांनी सुद्धा आमदार साहेबांना हनुमान मंदिराचे बांधकामात श्रमदान करायला बोलवावं असे आमदार साहेबांनी सांगितले अशी श्री.संतोष भाऊ रडके यांनी कोर्धा वासीयांना माहिती दिली.
*हनुमान मंदिराचे बांधकाम करीता आर्थिक मदत देताना
श्री. संतोषभाऊ रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड,विजयजी खोब्रागडे,गजानन कोहपरे, दिनेशजी चौधरी,अरुणजी गायधने,कालिदास नवघडे,अंतारामजी वाकुडकर,विनोद खेवले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.