अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना या बातमी द्वारे विनंती निवेदन विषय : – एकाच कुटुंबातील तीन अनाथ मुलांना शासनाच्या वतीने मदत मिळण्या बाबत

56

अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री
यांना या बातमी द्वारे विनंती निवेदन

विषय : – एकाच कुटुंबातील तीन अनाथ मुलांना शासनाच्या वतीने मदत मिळण्या बाबत

अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना या बातमी द्वारे विनंती निवेदन विषय : - एकाच कुटुंबातील तीन अनाथ मुलांना शासनाच्या वतीने मदत मिळण्या बाबत

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्यूरो चीफ
मीडिया वार्ता न्यूज . 8208166961

अमरावती : – श्री माननीय पालकमंत्री मॅडम ऍड. यशोमती ठाकूर अमरावती जिल्हा यांना या बातमी द्वारे विनंती करण्यात येत आहे की काही दिवसांपूर्वी आपल्या तिसवा तालुक्यातील पालवाडी येथे राहणारे श्री राहुलजी गजभिये यांचा २६ जानेवारी रोजी हार्ट अटैक मुड़े निधन झाले आणि ते हातमजुरी करणारे घरचे कर्ते होते आणि त्यांच्या निधनाने त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिति खूपच खराब आहे त्याना ३ मूले आहेत शिक्षणासाठी लागणारा खर्च पैसा नाही आता त्यांच्याकडे अस कोणी नाही जो त्या अनाथ मुलांचा सांभाळ करेल कारण ती मुल लहान लहान आहेत म्हणून माननीय पालकमंत्री मॅडम जर आपल्या कडून काही जर या तीन लहान अनाथ मुलांना मदत मिलत असेल तर या मुलांना बर होईल मय्यत राहुल गजभिये यांचा मोठा मुलगा हरीश गजभिये वय १७ वर्षाचा आहे तो ११ वा सायन्स ला आहे मधला मुलगा १४ वर्षाचा आहे ८ वि मध्ये शिकत आहे लहाण बहिन आहे इयत्ता ४थी मधे शिकत आहे आणि यांना शेती वैगरे काही नाही या मुलांची आई मळेल तेथे हातमजुरी करायला जाते आणि त्यात या कुटुंबाच भागत नसल्याने आपल्या कडून या कुटुंबाला काही मदत होत असेल तर याचं जीवन जगायला मदत होईल .

तसेच अशाच काही मोठ्या मोठ्या संस्थांना विनंती करतो की आपल्या कडूनही या कुटुंबासाठी काही मदत होत असेल तर आपण खाली दिलेल्या त्यांच्या लहान भाऊ यांना फोन करून मदत केली तर फारच बर होईल

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
श्री हरीश गजभिये (लहान भाऊ)
राहणार पालवाडी पोस्ट कवाडगव्हाण तालुका तिवसा जिल्हा अमरावती मोबाईल नंबर
८०८०८७३२४२