बोनमॅरो प्रत्यारोपणासाठी यशाला हवा आर्थिक मदतीचा हात “आवाहन भवाळ कुंटुबीयांकडून”
परळच्या वाडिया रुग्णालयात होणार शस्त्रक्रिया
गुणवंत कांबळे,मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०
मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) – पवईत राहणाऱ्या १५ वर्षांच्या यश भवाळ याला अप्लास्टिक एनेमिया हा रक्ताचा दुर्मिळ आजार झाला असून त्यासाठी त्याच्यावर बोनमॅरो प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. परळ येथील वाडिया रुग्णालयात ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी लागणारी औषधे आ करावी लागणार असल्याने शस्त्रक्रियेसाठी २५ लाखांचा खर्च येणार आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून यशला आर्थिक मदतीचा हात देण्याचे आवाहन भवाळ कुटुंबीयांनी केले आहे.
पवईत राहणारा यश हा भांडुपमधील सीबीएससी शाळेत दहावीला शिकत आहे. यशचे वडील किसन हे शाळेच्या गाडीवर चालक तर आई वनिता मदतनीस म्हणून काम करत होत्या. मात्र, कोरोनाच्या काळात या दोघांच्या नोकऱ्या गेल्याने आर्थिक परिस्थिती खालावली. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांना मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालयात फार्मसीमध्ये मदतनीस म्हणून
क्यूआर कोड
कंत्राटावर नोकरी मिळाली होती. मात्र, ही नोकरीही गेली असल्यामुळे सध्या भवाळ कुटुंबीयांकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. अशातच यश, पत्नी, मुलगी आणि आई अशा पाच जणांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्या पार्श्वभूमीवर, यशवर होणार्या शस्त्रक्रियेसाठी दानशुरांनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन किसन भवाळ यांनी केला आहे. तुमची मदत Vanita Kisan Bhawal, IFSC code KKBK0000681, Account no 1413260869 Sakinaka branch. त्यांना क्यूआर कोडने पैसे पाठवू शकता.