जलजिवन मिशन : 24 कोटींच्या 54 प्रस्तावांना मंजूरी
प्रती व्यक्ती प्रती दिवस 55 लिटर पाणी
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा, :प्रत्येक नागरिकास पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी जलजिवन मिशन राबविण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत जिल्हयातील 894 गावात पाणी पुरवठयाची कामे केली जाणार आहे. त्यानुसार 24 कोटी रुपये खर्चाच्या 54 प्रस्तावांना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजूरी दिली आहे. जिल्हाधिका-यांनी या योजनेचा आढावा घेतला.
आढावा बैठकीला जिल्हाधिका-यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, ग्रामिण पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता दिपक वाघ, वरीष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे, पाणी पुरवठयाचे उपविभागीय अभियंता विलास काळबांडे यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीस प्रतिदिवस 55 लिटर पाणी उपलब्ध करुन दयावयाचे आहे. पुर्वी 40 लिटर इतकी मर्यादा होती. ज्या गावांमध्ये 55 लिटर प्रति व्यक्ती याप्रमाणे पाणी पुरवठा केला जातो अशा गावांमध्ये नळ जोडणीची कामे मिशनमधून केली जात आहे. ज्या गावांमध्ये निकषाप्रमाणे पाणी पुरवठा होत नाही अशा गावांमध्ये सुधारनात्मक पुनर्जोडणीची अतिरिक्त् कामे केली जाणार आहे. त्यात पाईपलाईन, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था, उर्ध्व नलीकेचा समावेश आहे. ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांच नाही. अशी छोटी गावे व पाडयांमध्ये नविन योजना मिशन मधून करण्यात येत आहे.
योजने अंतर्गत जिल्हयाचा आराखडा तयार करण्यात आला असून आराखडयानुसार 894 गावांमध्ये पाणी पुरवठयाची लहान मोठी कामे केली जाणार आहे. आराखडयातील या कामापैकी परिपूर्ण असलेल्या 54 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावांची किंमत 24 कोटी रुपये इतकी आहे. पाणी पुरवठयाची ही कामे केली जात असतांना पुढील 30 वर्षाचा विचार करावयाचा आहे.
मंजूर झालेल्या प्रस्तावांमध्ये वर्धा तालुका कामठी, केळापूर, कुरझडी, सोनेगाव, बोदड, मांडवा, नटाळा, पेठ, पुलई, आमला, येसंबा, बोरगाव, सेलू तालुक्यातील सोंडी, मोही, रेहकी, मसाळा, हिवरा, मोर्चापूर, बोरखेडी, बोथली, घोराड, वानरविहिरा, नानबर्डी, आमगाव, सुरगाव, वडगाव. हिंगणघाट तालुका खेकडी, सोनेगाव, बाबंर्डा. समुद्रपूर तालुक्यातील बल्हारपूर, गणेशपूर. आर्वी तालुका एकलारा, गुमगाव, नांदपूर, वडाळा. आष्टी तालुका अजितपूर, नविन आष्टी, पंचाळा, इंदरमाळी, पेठ अहमदपूर, साहूर, जामगाव, वाडेगाव, सुजातपूर, सावंगा (पू). कारंजा तालुका मोर्शी, ठाणेगाव, खरसखांडा, रहाटी, काजळी, नागझरी, खापरी, लिंगामडावी, ब्राम्हणवाडा. या गावांचा समावेश आहे.
योजनेतंर्गत पाणी पुरवठा कामाचे परिपुर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बैठकीत दिले. ज्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत, ती कामे तातडीन सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी ग्रामिण पाणी पुरवठा विभागास दिले आहे.