डाटा एंट्री ऑपरेटर मानधना पासुन वंचित
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी :- आरोग्य विभागातील नियमित कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रशिक्षणार्थी डाटा एंट्री ऑपरेटर काम करीत आहेत. परंतु सप्टेंबरपासून त्यांचे मानधन अद्यापही देण्यात आले नाही. कंत्राट दिलेली संबंधित संस्था मानधन देण्यास टाळाटाळ करीत असल्याने प्रशिक्षणार्थी डाटा एंट्री ऑपरेटरवर उपासमारीची वेळ आली आहे.
पाच महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? उसनेवारी पैसे कोणी देत नसल्याने आम्ही आत्महत्या करावी का? असा सवाल प्रशिक्षणार्थी
डाटा एंट्री ऑपरेटरनी केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान व यशस्वी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रशिक्षणार्थी डाटा एंट्री ऑपरेटरची पदे भरण्यात आली. राज्यात ३ हजार तर गोंदिया जिल्ह्यातील ६७ पदांचा यात समावेश आहे. हे प्रशिक्षणार्थी डाटा एंट्री ऑपरेटर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालय प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी काम करीत आहेत. आठ तासांची ड्युटी असताना काही कर्मचारी दिवसरात्र कार्यालयातच बसतच वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून माहिती अपडेट ठेवण्याचे काम करतात.