रोहयो कामामुळे शेतीला मजूर मिळेना

59

रोहयो कामामुळे शेतीला मजूर मिळेना

रोहयो कामामुळे शेतीला मजूर मिळेना

 

✍मुकेश मेश्राम ✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखनी:-तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे झाली. त्यामुळे गावातील मजुरांनी शेतीच्या कामाकडे पाठ फिरविली आहे. शेतीची कामे करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे तुर्तास दोन महिने रोहयो कामे पुढे ढकलावी, अशी मागणी खेडेपार येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. खेडेपार येथे रब्बी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. फळभाज्या, पालेभाज्या, मिरच्या व इतर पिकांची लागवड केली आहे. शेतीची कामे सुरू आहेत. मात्र, कामासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांचा तुटवडा आहे. रोजगार हमीची कामे चालू केल्यामुळे खेडेपार येथील शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला
माल काढणीसाठी व तोडण्यासाठी मजुरांची कमतरता भासत आहे. या परिस्थितीमुळे शेतात पिकविलेला भाजीपाला तोडा न केल्यास तसाच ठेवावा लागेल. ‘पिकेल तर विकेल असे सरकारचे धोरण आहे. पण मजूरच मिळणार नाहीत तर तोडणार कोण? बाजारात विकण्यासाठी कसे नेणार? असा प्रश्न आता खेडेपार येथील शेतकऱ्यांना पडला आहे. गावात मजरांची टंचाई आहे. बुधवारपासून जर रोजगार हमीची कामे सुरू झाली तर शेतातील माल तोडण्यासाठी मजूर मिळणार नाहीत, या चिंतेने शेतकरी हैराण आहेत. रोजगार हमीची कामे दोन महिने पुढे ढकलावी, अशी मागणी निवेदनाद्वारे खेडेपार येथील शेतकऱ्यांनी केली आहे.