महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशीची मागणी • राजेश बेले यांचा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

63

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशीची मागणी

• राजेश बेले यांचा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशीची मागणी • राजेश बेले यांचा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 3 फेब्रुवारी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव आणि प्रभारी वैज्ञानिक अधिकारी बिपीन भंडारी यांच्यावर Sunflag Iron and Steel Co. Ltd. बेलगाव अंडरग्राऊंड कोळसा खाणी प्रकल्पामुळे घातक रासायनिक द्रव्यांच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्याचा आरोप आहे. 16 जानेवारी 2024 रोजी घेतलेल्या नमुन्यांच्या विश्लेषण अहवालात हे फेरफार करण्यात आले असल्याचे आरोप आहे.

बेले यांच्या म्हणण्यानुसार, हे दोन्ही अधिकारी 2023 पासून पदावर आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात अनेकदा जल आणि वायू प्रदूषणाच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्यात आले आहेत. यामुळे औद्योगिक कंपन्यांना फायदा झाला होऊन पर्यावरणाचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बेले यांनी केली आहे.