पाच शाळकरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार….आरोपी व बस ताब्यात

56
पाच शाळकरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार....आरोपी व बस ताब्यात

पाच शाळकरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार….आरोपी व बस ताब्यात

पाच शाळकरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार....आरोपी व बस ताब्यात

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

नेरळ-दहिवली,
दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी दहिवली येथील निसर्ग रम्य वातवरणात स. बाग येथे सेवेन इंटरनॅशनल स्कूल मुलुंड पूर्व यांच्या शाळेतील मुलींची सहल आली होती जिच्या क्रमांक एम. एच. ४३ बी.पी. ४२९८ सदरील बसमधील चालक अंकुश संजय आढांगळे वय 28 वर्ष राहणार कोरेगाव जिल्हा सातारा यांनी प्रौढ कोणी नसल्याचा संधीचा फायदा घेत बसमधील पाच अल्पवयीन मुलींवर बसमध्ये त्यांच्या सोबत अश्लील चाळे करून त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ही बाब मुलींनी शाळेतील शिक्षिका यांना सांगितली. शिक्षिकेने विलंबन लावता नेरळ पोलीस ठाणे गाठले व प्रभारी अधिकारी श्री शिवाजी ढवळे यांना पूर्ण हकीगत सांगितली. ही बाब गंभीर असल्याकारणाने उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लागरे यांना सांगण्यात आली घटनेचे गांभीर्य ओळखून श्री विजय लगारे यांनी शहानिशा करून आरोपीस अटक करण्यास सांगितले व आरोपीस पोस्को अंतर्गत ०२१/२०२४ भा.दं.वी.स. कलम ३५४ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२न चे कलम ८/१२ प्रमाणे गुन्हा नोंद केला असून बस पोलीस ठाण्यात जमा केली आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दहातोंडे करीत आहेत.