भास्कर जाधव यांनी घसा फोडला तरीही महाड विधानसभा मतदार संघातील जनता आपल्या सोबत : आ. भरतशेठ गोगावले
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगाव:- माणगांव येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्यात आ. भास्कर जाधव यांनी केलेल्या टिकेला उत्तर देण्यासाठी प्रसार माध्यमाशी बोलताना आ. भरतशेठ गोगावले यांनी गुहागर आणि दापोली मतदार संघात योगेश कदम, रामदास कदम, शेखर निकम, ना. उदय सामंत यांच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांमुळे भास्कर जाधव यांच् rया पायाखालची वाळू सरकायला लागली असून त् काटीय करयाची मतदार संघा वरील पक्कड ढिली पडली अस ल्याने ते सैरभैर झा ले आहेत . त्यांनी आपला घसा फोडून कितीही भुल थापा मारल्या तरीही महाड मतदार संघातील जनता आपल्या सोबत अस णार आहे असा विश्वास आ. गोगावले यांनी व्यक्त केला.
सुरत येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाऊन ४० आमदारांनी जो उठाव केला त्यावेळी भास्कर जाधव यांनी ही एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र आता ते जिथे आहेत तेथेच बरे आहेत असा टोला आ. गोगावले यांनी लगावला .