श्रीगणेश जयंती निमित्त सुखकर्ता गणेश मंदिरातर्फे भव्य निशुल्क आरोग्य शिबीर संपन्न
भव्य कलश यात्रा व जाहीर कीर्तन व महाप्रसादाचा आयोजन
साहिल सैय्यद 🖋️/प्रतिनिधि
घुग्घूस : शहरातील ड्रीमलँड सिटी येथील सुखकर्ता गणेश मंदिर सेवा समिती व डॉ. कोल्हे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारी 2025 रोजी भव्य निशुल्क आरोग्य शिबाराचे आयोजन करण्यात आले यात हजारो नागरिकांनी वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला
साई ऑप्टिकल तर्फे गजानन नागोसे यांनी नेत्र रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक डॉ. सुरेश कोल्हे सर होते
या वैद्यकीय शिबिरात डॉ. नचिकेत कोल्हे (MBBS MD MEDESIN )
बालरोग तज्ञ डॉ. समृद्धी वासनिक (MBBS ) श्व्सनरोग तज्ञ् डॉ. गणेश कौरासे, (MBBS TDD MS ) स्त्रीरोग तज्ञ डॉ.नगीना नायडू (MBBS DG )नेत्ररोग तज्ञ डॉ. भूषण चौबे (MBBS MS FPOS )यांच्या तर्फे नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
सांयकाळी मंदिराच्या वतीने भव्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी सुंदर असा रथ ही निर्माण करण्यात आला.
दिनांक 01 फेब्रुवारी रोजी सकाळी 07 वाजता अभिषेक होम हवन करून श्रीगणेश जयंती साजरी करण्यात आली
ह. भ. प. डाखरे महाराज यांचे जाहीर कीर्तनचा कार्यक्रम उत्साहात पार पडला सांयकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात जवळपास सहा हजार नागरिकांनी महाप्रसाद ग्रहण केला.
महाप्रसाद कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी आवर्जून उपस्थित होते.
सुखकर्ता गणेश मंदिर सेवा समिती, शारदा महिला मंडळ ड्रीमलँड सिटी, वरिष्ठ नागरिक ड्रीम लँड सिटी व्यापारी मित्र व नागरिकगणांचा सहकार्य मिळाला.