बॅग व स्टेशनरी च्या नावा खाली विकली जात होती अमली पदार्थ

43

बॅग व स्टेशनरी च्या नावा खाली विकली जात होती अमली पदार्थ 

बॅग व स्टेशनरी च्या नावा खाली विकली जात होती अमली पदार्थ

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी.
मो 9096817953

उमरेड :- उमरेड, उमरेड मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या एका स्टेशनरी दुकानातून शालेय विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विकल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी हे दुकान एक महत्त्वाचे ठिकाण बनले असताना, तेथे अमली पदार्थांचा विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पाचवी, सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी “ई सिगारेट” स्टेशनरीच्या दुकानातून विकत घेतली होती. त्या विद्यार्थ्यांना ई सिगारेट म्हणजे काय समजत नव्हते. त्यात काही विद्यार्थ्यांना त्यात पाणी टाकले की धूर निघतो एवढीच माहिती होती. हे लक्षात आल्यानंतर एका पालकाला ही वस्तूला पाहून शंका निर्माण झाली. त्यावर त्यांना विद्यार्थ्यांनी सांगितले की, ही पांढऱ्या रंगाची वस्तू आहे आणि पाणी टाकले की धूर निघतो. त्यामुळे पालकांची शंका योग्य ठरली आणि त्यांनी इतर पालकांसोबत या बाबीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी स्टेशनरीच्या दुकानातून ही वस्तू घेतल्याचे कबूल केले. त्याचवेळी विद्यार्थ्यांनी काही गंभीर खुलासे केले, ज्यात त्यांनी सांगितले की, या स्टेशनरीच्या दुकानात ई सिगारेट्स, गांजाचे सिगारेट्स, एमडी पावडर, हॉर्स पावडर, अबॉर्शन गोळ्या अशा विविध प्रकारच्या अमली पदार्थांची विक्री केली जात आहे. या वस्तू एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत विकल्या जात होत्या.