रायगड जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायत नव्याने बांधण्यात येणार

59

रायगड जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायत नव्याने बांधण्यात येणार

रायगड जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायत नव्याने बांधण्यात येणार

इमारतीसाठी साडेपाच कोटींचा निधी

अलिबाग (रत्नाकर पाटील)

अलिबाग :- रायगड जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतीना स्वतःचे ग्रामपंचायत कार्यालय बाधण्यासाठी ५ कोटी 55 लाख रुपये निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत बाष्ठेवाड व ग्रामपंचायत विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दिली.

राज्यातील ज्या ग्रामपंचायतीना स्वतःच्या कार्यालया साठी स्वतंत्र इमारत नाही, अशा ग्रामपंचायतीना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय नाही अशा २६ ग्रामपंचायतींना स्वतःची कार्यालय बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत निधी मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्राम विकास विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी पाच कोटी 55 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.या सर्व ग्रामपंचायत इमारतीचे हरित ग्रामपंचायत म्हणून बांधकाम करण्यात यावे, तसेच ग्रामपंचायतीला सोलरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध केला जावा, तसेच बांधकाम करताना हरित संकल्पना जोपासण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

*निधी मंजूर झालेल्या ग्रामपंचायती कोणत्या* अलिबाग-वैजाली.पेण- काळेश्री,कोपर .पनवेल- जांभिवली .उरण-नागाव, म्हातावली,नवघर. कर्जत-जिते,वडप, अंभेरपाडा.खालापूर- आसरे, वरोसे, लोधिवली, चौक. माणगाव- हरकोळ, टेनपाले.महाड-शैले, आसनपोई.म्हसळा – निगडी. पोलादपूर- पालचीळ, ओबली महाळुंगे, महालंगुर. श्रीवर्धन- नागलोली, सायगाव.मुरुड- आगरदांडा

या २६ ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी पाच कोटी 55 लाख रुपये निधी मिळाला होता. त्यानुसार ग्रामपंचायत बांधण्याचे काम सुरू असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बाष्ठेवाड यांनी सांगितले.