वीस वर्षाच्या रशियन सैनिकाने युक्रेनच्या नागरिकांसमोर शरणागती पत्करली आणि...

रशियाने आक्रमणाला सुरुवात केल्यापासून आजवर २८७० युक्रेनियन सैनिक आणि २००० हजार युक्रेनियन नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. तर तब्बल ९००० हजार रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष यांनी दिली आहे.

वीस वर्षाच्या रशियन सैनिकाने युक्रेनच्या नागरिकांसमोर शरणागती पत्करली आणि…

सिद्धांत
मीडिया वार्ता न्युज
३ मार्च, मुंबई: रशियाने युक्रेनवर आक्रमणाला सुरुवात केल्यापासून जवळपास आठवडा होत आला आहे. रशियाच्या बलाढ्य सैन्यापुढे युक्रेनच्या सैन्याने जिकीरीचा लढा दिला आहे. रशियाने युक्रेनवरील आक्रमण थांबवावे म्हणून जगभरातील देशांनी रशियावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. परंतु रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी विरोधाला न जुमानता आक्रमणाची तीव्रता अधिकच वाढल्याने जगभरातूनच नव्हे, तर रशियाच्या नागरिकांकडून देखील या युद्धाला मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात येत आहे. युक्रेन देशावर आक्रमणाच्या विरोधात रशियाची राजधानी मॉस्को येथून तब्बल ६००० हजार नागरिकांना अटक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच युक्रेनवर आक्रमण करताना रशियाने वापरलेल्या युद्धनीतीवर जगभरातून टीका होत आहे. रशियन सैन्याने सैनिकी तळांबरोबरच युक्रेनच्या नागरी वस्ती, सरकारी इमारतीं, दवाखाने यांवर मिसाईलने बेछूट हल्ले घडवून आणले आहेत. तसेच पुरेशा साधनांशिवाय, योग्य लष्करी प्रशिक्षणाशिवाय २० -२२ वर्षाच्या अल्पवयीन सैनिकांना जमिनी मार्गाने युक्रेनमध्ये पाठवले आहे. यातील बऱ्याच जणांना त्यांच्या मोहिमेची पुरेशी माहिती नाही आहे. अपुऱ्या माहितीमुळे युक्रेनच्या शहरातून आगेकूच करताना हे सैनिक रस्ता भटकून हरवत असल्याची माहिती युक्रेनचे नागरिक देत आहेत. यासंबंधीचे अनेक विडिओ सोशल मीडियावर टाकत आहेत.

असाच एक २० वर्षाच्या रशियन सैनिकाचा विडिओ युक्रेनियन नागरिकांकडून व्हायरल केला जात आहे.

https://youtu.be/ItKj_TgWkSM

ह्या व्हिडिओमध्ये एक २० वर्षाच्या सैनिकाला युक्रेनियन सैन्याने ताब्यात घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांनतर घाबरलेल्या या सैनिकांची भूक भागवण्यासाठी त्याला खाद्यपदार्थ देऊ केल्याचे दिसत आहे. याबरोबरच लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे फोनवरून पलीकडच्या बोलणाऱ्याचा आवाज ऐकू आल्यावर त्या रशियन सैनिकाचे बदलेले हावभाव. युक्रेनियन सैनिकांनी ताब्यात घेतल्यानंतर रशियात राहणाऱ्या त्याच्या आईला फोन लावून दिला. आईला पाहताच रशियन सैनिकाला आपले अश्रू आवरले नाही. गहिवरलेल्या सैनिकाला युक्रेनियन महिला सैनिक धीर देत असल्याचे आपल्याला दिसत आहे.

यादरम्यान युक्रेनियन सैनिकांकडून रशियन भाषेतून त्या सैनिकाच्या आईला आवाहन करण्यात येत आहे, तुम्ही रशियन नागरिकांना सांगा कि रशिया तुमच्या मुलांना मरण्यासाठी युक्रेनमध्ये पाठवत आहे. तुमचा मुलगा सुरक्षित आहे, त्याला आमच्याकडून काहीही धोका होणार नाही. पण तुम्ही रशियामध्ये या आक्रमणाविरुद्ध आवाज उठवा. तुमच्या सैन्याला रोखा. तुमच्या सैन्यातील मुलांचा इथे युद्धात नाहक बळी जात आहे. 

त्यानतंर आपल्या मुलाच्या काळजीने व्यथीत झालेल्या त्या रशियन आईने मुलाला परत रशियात कसा आणता येईल, याबद्दल विचारणा केली असता. युक्रेनियन महिला त्या आईला धीर म्हणत आहे कि, तुमचा मुलगा आमच्याकडे सुरक्षित आहे. योग्य व्यवस्था झाली कि आम्ही तुम्हाला संपर्क करू.पुढे तो रशियन सैनिक गहिवरल्या चेहऱ्याने आपल्या आईचा निरोप घेताना आपल्याला दिसत आहे.

 

हे आपण वाचलंत का?

 

अशाप्रकारच्या अनेक घटना युद्ध सुरु झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रसारित केल्या जात आहेत. युक्रेनियन सैन्य आणि नागरिक रशियन आक्रमणाला प्राण पणाला लावून तोंड देत युक्रेनचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी लढत आहेतच, पण त्याचबरोबर पकडल्या गेलेल्या रशियन सैनिकांची माणुसकीच्या नात्याने योग्य काळजीही घेत असल्याचे दिसून येत आहे.

रशियाने आक्रमणाला सुरुवात केल्यापासून आजवर २८७० युक्रेनियन सैनिक आणि २००० हजार युक्रेनियन नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. तर तब्बल ९००० हजार रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here