विदर्भात कोरोना वायरस बांधीत रुग्णाचा विस्फ़ोट, काल 8012 नविन रुग्ण, 91 मृत्यू.
✒प्रशांत जगताप कार्यकारी संपादक✒
नागपूर,दि.3 अप्रैल:- विदर्भात कोरोना वायरसची स्थिती चिंताजनक आहे. रोज विदर्भातील जिल्हात शेकोडोच्या वर रुग्ण समोर येत आहे. सध्या देशातील सर्वात मोठ्या हॉटस्फोट हे विदर्भात असल्याचे दिसुन येत आहे. शुक्रवारी विदर्भात कोरोनाचा मोठा विस्फ़ोट झाल्याचे समोर आले आहे. काल 2 अप्रैल ला 8012 नविन कोरोना वायरस बांधीत रुग्णांची नोंद झाली. 91 कोरोना वायरस बांधीत रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
विदर्भातील नागपूर जिल्ह्यासह भंडारा व वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले. नागपूर जिल्ह्यात 4108 रुग्ण व सलग दुसऱ्या दिवशी 60 रुग्णांचे बळी गेले. भंडारा जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्येचे जुने विक्रम मोडित निघाले. 793 रुग्ण व 3 रुग्णांचा मृत्यु. वर्धा जिल्ह्यात 399 रुग्ण व 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे नोंदविण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यात 665 रुग्ण व 5 रुग्णांचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. 545 रुग्ण व 7 रुग्णांचा मृत्यु झाला. अकोला जिल्ह्यात 317 रुग्ण व 4 मृत्यू, वाशिम जिल्ह्यात 301 रुग्ण, चंद्रपूर जिल्ह्यात 297 रुग्ण व 2 मृत्यू, अमरावतीत 275 रुग्ण व 4 मृत्यू तर, गोंदिया जिल्ह्यात 209 रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातही आज सर्वाधिक 103 रुग्ण कोरोना वायरस बांधीत सामोर आले.
जिल्हा रुग्ण मृत्यु
नागपूर :- 4,108 60
गडचिरोली :- 103 00
चंद्रपूर :- 297 02
गोंदिया :- 209 01
भंडारा :- 793 03
वर्धा :- 399 05
यवतमाळ :- 545 07
बुलडाणा :- 665 05
वाशिम :- 301 00
अकोला :- 317 04
अमरावती :- 275 04