रायगडमध्ये आदिवासी महिलेवर आधी बलात्कार मग केला खून. पोलिस तक्रार दाखल करण्यात करत आहे टाळाटाळ.

58

रायगडमध्ये आदिवासी महिलेवर आधी बलात्कार मग केला खून. पोलिस तक्रार दाखल करण्यात करत आहे टाळाटाळ.

रायगडमध्ये आदिवासी महिलेवर आधी बलात्कार मग केला खून. पोलिस तक्रार दाखल करण्यात करत आहे टाळाटाळ.

रायगड:- जिल्हातील खालापूर तालुक्यात विटभट्टी वर कामगार म्हणून काम करणा-या आदिवासी कातकरी महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या झाल्याची संतापजनक घटना घडली समोर आली आहे. त्यामुळे रायगड जिल्हात लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. रायगड खालापूर तालुक्यात आदिवासी महिलांवर बलात्कारानंतर तिची हत्या होते, ईतक्या गंभीर प्रकरणाची साधी दखलही घ्यायला सरकारी यंत्रणा आणि पोलिस कुचकामी ठरतात. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो.

प्राप्त माहितीनुसार रायगडमधील खालापूर तालुक्यात एका विटभट्टी कामगार असलेल्या आदिवासी कातकरी महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या झाल्याची संतापजनक घटना घडली. विशेष म्हणजे या घटनेनंतर या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात गेलेल्या नातेवाईकांची तक्रार घेण्यासही पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली. अखेर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्ती केल्याने इतर सजग नागरिकांच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात आलीय. पीडित महिलेवर 31 मार्च रोजी दुपारी बलात्कार करण्यात आला. एका रिक्षाचालकाने हे कृत्य केल्याचा संशय आहे.

पीडित महिला वय 42 घरी लग्न असल्याने आपल्या नवऱ्याला वीटभट्टीवरुन आणण्यासाठी सकाळी 10 च्या दरम्यान जवळच्या गावातील रिक्षा भाड्याने घेऊन निघाली. मात्र, ती आपल्या नवऱ्यापर्यंत पोहचलीच नाही. बऱ्याच उशिराने दुपारी 2 च्या दरम्यान संबंधित रिक्षाचालक वीटभट्टीवर तिच्या नवऱ्याकडे गेला. तुझी बायको तुला न्यायला आली आहे आणि मालक सुट्टी देणार नाही म्हणून इथं न येता पुलाखाली थांबली आहे तर तू पटकन आवरून चल असं तो म्हणाला. नवरा जेव्हा 100 मीटर अंतरावरील पुलाखाली पोहोचला तेव्हा त्याला कडेच्या झुडुपात बायको बेशुद्धावस्थेत पडलेली आढळली. पीडितेच्या नवऱ्याने त्या रिक्षा चालकास बायकोला दवाखान्यात नेऊ असे म्हटले. मात्र रिक्षा चालकाने मला काम आहे सांगून तिथून पळ काढला. त्यानंतर पीडितेला वीटभट्टी मालकाच्या गाडीतून दवाखान्यात नेण्यात आले. या ठिकाणी महिला मृत असल्याचे निष्पन्न झाले.

पीडितेच्या नवऱ्याने तिला हेमडी या गावी अंत्यसंस्कारासाठी आणले. मात्र गावातील महिलांनी मृत महिलेस तपासले असता तिच्या अंगावर अंतर्वस्त्रे नव्हती, गुप्तांगाला सूज आलेली होती आणि विर्यसदृश्य द्रव तिथे सांडल्याचे आढळले. तसेच अंगावरील साडी नेसली नसून गुंडाळलेली दिसली. यावरून बलात्कार झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे हे कृत्य रिक्षावाल्यानेच केल्याचा संशय आला.

पण पोलिसांकडून महिला चक्कर येऊन मृत पावल्याची नोंद.

यानंतर रात्री 10 वाजता पीडितेचा पती आणि इतर लोक महिलेला घेऊन पोस्टमार्टमसाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आले. मात्र, डॉक्टर नसल्याने त्यांना सकाळी 9 वाजता या असे सांगण्यात आले. त्याचवेळी ते खालापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास गेले. मात्र, पोलिसांनी बलात्कार व खून अशी तक्रार दाखल न करता महिला चक्कर येऊन मृत पावली असा लिहून घेतला.