मीरा-भाईंदर येथील 60 वर्षीय नराधम धर्मगुरुने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार.

56

मीरा-भाईंदर येथील 60 वर्षीय नराधम धर्मगुरुने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार.

मीरा-भाईंदर येथील 60 वर्षीय नराधम धर्मगुरुने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार.

✒दयानंद सावंत, प्रतिनिधी✒
मुंबई,दी.3 मार्च:- मुंबई येथील उपनगर मीरा-भाईंदर परिसरात एका नराधम धर्मगुरूने 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा धर्मगुरू मूळचा गुजरातमधील आहे. मात्र, तो सध्या मीरा-भाईंदरमध्ये वास्तव्याला आहे.

मुंबई पोलिसांना हॉटेल मध्ये मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी वेश्या व्यवसाय सुरु असणाऱ्या हॉटेलवर धाड टाकल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

मीरारोड पूर्वेकडील महामार्गालगत असणाऱ्या पय्याडे हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने पय्याडे हॉटेलवर धाड टाकली. त्यावेळी वेश्यागमनासाठी आणलेल्या तीन मुली हॉटेलमध्ये सापडल्या. यामध्ये एका 16 वर्षांच्या मुलीचाही समावेश होता.

पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलीने धक्कादायक कबुली दिली. मीरा-भाईंदर परिसरातील एक धर्मगुरू तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करत होता. या पीडित मुलीची विचारपूस करुन तिच्याकडून सर्व माहिती काढून घेण्यात आली. त्यानंतर नया नगर पोलिसांनी या 60 वर्षीय धर्मगुरुला बेड्या ठोकल्या आहेत.

नया नगर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कायदे कलमानुसार या धर्मगुरुवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या धर्मगुरुची कसून चौकशी करत आहेत. यामधून आणखी काही माहिती समोर येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.