महाराष्ट्रातील उल्का आणि अंतराळातील कचरा

123
Meteors and Space Debris in Maharashtra
Meteors and Space Debris in Maharashtra

अंतराळातून पृथ्वी तुम्हाला वाटते तशी दिसत नाही. तंत्रज्ञानाच्या नजरेतून पृथ्वी कशी दिसते?

मनोज कांबळे
३ एप्रिल, मुंबई: दोन एप्रिलच्या रात्री विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जिह्यांवरील आकाशातून आगीचे गोळे प्रचंड वेगाने प्रवास करताना दिसले. हे आगीचे गोळे धूमकेतूंचा भाग असावे असा प्रत्यक्षदर्शी नागरिकांचा अंदाज होता. परंतु विदर्भातील काही गावांमध्ये हे आगीचे गोळे कोसळताना नागरिकांनी पहिले. घटनास्थळी शोध घेतल्यानंतर नागरिकांना धातूचे गोळा, रिंग सापडले, त्यानंतर हे आगीचे गोळे धूमकेतू नसून कृत्रिम उपग्रहाचे भाग असल्याचा कयास खगोल शास्त्रज्ञानी लावला.

जगभरातील देशांच्या अवकाश संस्थामार्फत अवकाशात सोडलेले उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असताना तांत्रिक बिघाडामुळे पृथ्वीच्या वातावरणात शिरतात. काहीवेळा तर निकामी झालेल्या उपग्रहांना नियंत्रित पद्धतीने अवकाशामध्येच नष्ट करण्यात येते. अश्यावेळी उपग्रहांचे यांत्रिक भाग पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खेचले जातात. बरेचसे भाग कोसळतानाच जाळून खात होतात, पण काही भाग थेट जमिनीवर कोसळतात. अश्या घटनांमुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानी होण्याचा धोका असतो. कालच्या घटनेमध्ये सुदैवाने असे काही झाले नाही.

परंतु हे काही शेवटचे नाही. हि गोष्ट फार गंभीर आहे. या गंभीरतेची जाणीव करून घ्यायची असेल तर खाली दिलेले फोटो पहा.

Meteors and Space Debris in Maharashtra
Meteors and Space Debris in Maharashtra

पहिला फोटो तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. निळंशार पाणी, बर्फाळ प्रदेश, हिरवाई आणि वाळवंटी प्रदेशाने नटलेलं हे आपलं घर, म्हणजे पृथ्वी अंतराळातून अशी दिसते.परंतु तंत्रज्ञानाच्या सुक्ष्म आणि चाणाक्ष नजरेतून पहिले तर अंतराळातून आपली पृथ्वी कशी दिसते हे, खाली दिलेल्या फोटोमध्ये पहा.

Meteors and Space Debris in Maharashtra
Meteors and Space Debris in Maharashtra

 या फोटोमधील प्रत्येकी एक सफेद बिंदूं पृथ्वीभोवती फिरणारी मानवनिर्मित यंत्र आहेत. अवकाश तंत्रज्ञानाचा शोध लागल्यापासून गेल्या साठ – सत्तर वर्षात जगभरातल्या देशांनी असंख्य कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले आहेत. दरवर्षाला नवं नवीन तंत्रज्ञानयुक्त उपग्रह अवकाशात सोडले जात आहेत. सध्याच्या घडीला पृथ्वीभोवती तब्बल सात हजार उपग्रह प्रदक्षिणा घालत असल्याच्या अवकाश संस्थांचा अंदाज आहे. कोणत्याही यंत्रासारखेच या उपग्रहांमध्ये तांत्रिक बिघाड होतात. ते निकामी ठरतात. काहीवेळा तर त्यांचा अवकाशामध्येच विस्फोट होतो. अश्यावेळी हे निकामी यांत्रिक भाग पृथ्वीभोवती प्रचंड वेगाने फिरत राहतात.

अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाच्या मते ट्रॅक करता येण्यासारखे असे तब्बल २७ हजार निकामी भाग पृथ्वी भोवताली फिरत आहेत. त्यात भर म्हणजे आकार लहान असल्याने ट्रॅक न करता येण्यासारखे अजून २३ हजार भाग सुद्धा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. नासा या अंतराळातील या निकामी भागांना सोप्या भाषेत ” अंतराळातील कचरा” असे म्हणते.

हे यांत्रिक भाग आकाराने लहान-मोठे असले तरी त्यामुळे होणारे दुष्परिणाम हे फार घातक असतात. निकामी उपग्रहाचा एका छोट्या चेंडूएवढा तुकडाही अवकाश यान, उपग्रहांना उध्वस्त करू शकतो. काहीवेळा हे निकामी यांत्रिक भाग जमिनीवर कोसळतात. प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या ज्वलनशील अवस्थेत असणारे हे यांत्रिक भाग दाटीवाटीच्या शहरी भागात, नागरी वस्तींवर कोसळल्यास काय होऊ शकते, याची कल्पनाच न केलेली बरी.

जगभरातल्या देशांना या अंतराळातील कचऱ्याची गंभीरता अलीकडेच कुठे कळायला लागली आहे. सद्यातरी या कचऱ्याला नष्ट करण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नसला तरी, २०२५ सालापासून अमेरिकन, युरोपियन अवकाश संशोधन संस्थांकडून अंतराळातील कचरा नष्ट करण्यासाठी खास मोहिमाच्या प्राथमिक तयारीला सुरुवात होणार आहे. या मोहिमांच्या यशस्वी होण्यावर अवकाश तंत्रज्ञानाची सुरक्षित आणि पर्यायाने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची सुरक्षितता अवलंबून आहे.

पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या उपग्रहांचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी  पाहण्यासाठी तुम्ही खालील वेबसाईटला भेट देऊ शकता. 

वेबसाइट: http://astria.tacc.utexas.edu/AstriaGraph/

हे आपण वाचलंत का?