जिल्हा वार्षिक नियोजनाचा निधी 2022 अखेर 100% खर्च करण्यात रायगड जिल्हा राज्यात अव्वल स्थानी
✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
अलिबाग(रायगड):- जिल्हा वार्षिक नियोजनाचा निधी विहित कालावधीत (मार्च 2022 अखेर) खर्च करण्यात राज्यात रायगड जिल्ह्याने अवल स्थान पटकाविले आहे आर्थिक वर्ष 2021-2022 करिता शासनाकडून जिल्हा वार्षिक नियोजनाचा मंजूर व प्राप्त निधी रुपये 275 कोटी इतका होता हा संपूर्ण निधी पालकमंत्री कु. आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध विकास व प्रशासकीय कामांसाठी शासकीय यंत्रणांना वितरित करण्यात आला होता यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी श्री मेहेत्रे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री देसाई आणि त्यांच्या इतर सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले दिनांक 31 मार्च 2022 अखेर राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी रायगड जिल्ह्याने रुपये 275 कोटी हा संपूर्ण निधी शंभर टक्के खर्च करण्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे हे सर्वांच्या योग्य नियोजनाचे यश आहे.