ब्रह्मपुरी महसूल कार्यालयात हितसंबंधित व वाळू तस्करांचा बोलबाला लोकसेवकांकडून शिष्टाचाराची पायमल्ली होतं असल्याने सर्वसामान्यांची होरपळ

ब्रह्मपुरी महसूल कार्यालयात हितसंबंधित व वाळू तस्करांचा बोलबाला

लोकसेवकांकडून शिष्टाचाराची पायमल्ली होतं असल्याने सर्वसामान्यांची होरपळ

ब्रह्मपुरी महसूल कार्यालयात हितसंबंधित व वाळू तस्करांचा बोलबाला लोकसेवकांकडून शिष्टाचाराची पायमल्ली होतं असल्याने सर्वसामान्यांची होरपळ

क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी/विशेष
9545462500

ब्रम्हपुरी :- गौणखनिज तस्करीमुळे महसूल प्रशासनावर तालुक्यातील नागरिकांतून चौफेर ताशेरे ओढले जातं असतांना व वृत्तपत्रात वारंवार प्रकाशित होणाऱ्या बातम्यांमुळे ब्रम्हपुरी तालुक्याची नाहक बदनामी होतं असतांना सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना महसूल कार्यालयात ताटकळत ठेवत, शिष्टाचार विसरणारे लोकसेवक तस्करीत संलग्न, हितसंबंधित लोकांसह तासंतास कार्यालयीन कामकाजाचा वेळ घालवत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

६० किलोमीटर पर्यंत विस्तार असलेल्या महसूल कार्यालयात सामान्य नागरिक मोठ्या अपेक्षेने येत असतो प्रसंगी त्याला ये-जा करण्यात दळणवळणाचे साधन उपलब्ध होतं नसल्याने खूप त्रास सहन करावे लागते मात्र महसूल कार्यालयात दलाल, तस्करांचा बोलबाला बघता सामान्यांची नेहमीच उपेक्षा होतं असल्याचे नागरिक नाराजीच्या स्वरात सांगत असून कसेबसे साहेबानं पर्यंत पोहचलोत तर साहेब लोक अजिबात वेळ देतं नसल्याने समाधान होतं नाही.

वास्तविक अधिकारी, कर्मचारी हे लोकसेवक असून त्यांनी लोकांची कामे प्राधान्याने करायला हवे,
त्यांनी सामांन्यातील सामांन्य नागरिकांचे म्हणने ऐकून घेणे महत्वाचे असते व ही त्यांची जवाबदारीचं आहे.मात्र थोड्या थोडया कामासाठी ताटकळणाऱ्या नागरिकाचे काम दोन मिनिटात बोलून बाहेर करत निपटवणारे उच्चशीक्षित महसूल अधिकारी मोकळे होत असल्याने सामान्य नागरिकांना कमालीचा आर्थिक, शारीरिक, व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने अशा लोकसेवकांबद्धल नागरिकांत कोणताही सन्मान उरला नाही हे तितकेच खरे असून स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने अशा गंभीर विषयावर लक्ष घालून यावर अंकुश घालावे हि जनमानसाची रास्त अपेक्षा तालुक्यातून होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here