इंधन दरवाढीच्या निषेधार्थ भाजपचे अभिनंदन करण्यासाठी युवासेनेचे थाळी वाजवा आंदोलन
क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी/विशेष
9545462500
ब्रम्हपुरी :- युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री मा.आदित्यजी ठाकरे व युवासेना सचिव मा.वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या माध्यमातून ब्रम्हपुरी तालुक्यात बाबा फरीद पेट्रोल पंप ब्रम्हपुरी येथे केंद्र सरकारने केलेल्या अमानुष इंधन दरवाढीच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करत रविवार, दिनांक ३ एप्रिल २०२२ रोजी थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.
युवासेना शहर प्रमुख अमोल माकोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीचा जोरदार निषेध केला. महागाई मुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाही भाजप मात्र इतर राज्यातील निवडणुकीत मिळालेला विजय साजरा करत सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. याप्रसंगी युवासैनिक व युवतींनी इंधन दरवाढ लादणाऱ्या भाजप सरकारचे प्रतिकात्मक अभिनंदन करून नागरिकांच्या भावनांचा केंद्र सरकारने विचार करावा व इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी जोरदार मागणी थाळी वाजवत केली.
या आंदोलनात युवासेना तालुका प्रमुख आकाश शेंद्रे, शहर प्रमुख अमोल माकोडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मिलिंद भाऊ भणारे,शिवसेना तालुका प्रमुख नरेंद्र नरड,शिवसेना शहर प्रमुख किशोर चौधरी,यूवासेना उपशहर प्रमुख आशु गांडलेवर, राहुल टोंगे, तेजस चौधरी, अमोल ठिकरे, नरेश आठोळे, बंटी सहारे, चेतन गुंजेकार, निकेतन गुंजेकर, पंकज भोयर, पवन सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने युवासेना, शिवसेना पदाधिकारी,युवासैनिक,शिवसैनिक व सामान्य जनता सहभागी झाले होते.