शासकीय आश्रम शाळा चिंधीचक येथे गुढीपाडवा निमित्त शाळा प्रवेश अभियान.

शासकीय आश्रम शाळा चिंधीचक येथे गुढीपाडवा निमित्त शाळा प्रवेश अभियान.

शासकीय आश्रम शाळा चिंधीचक येथे गुढीपाडवा निमित्त शाळा प्रवेश अभियान.

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभीड -तालुक्यातील मौजा- चिंधीचक येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमुर यांच्या सूचनेनुसार आज आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत शासकीय आदिवासी आश्रम शाळा येथे गुढीपाडव्याचे निमित्ताने शाळा प्रवेश अभियान राबविण्यात आले. या अभियानात शाळेत शासकीय आश्रम शाळेतील प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या मुख्यत्वे 1 ते 4 अत्यंत कमी असल्याने ती वाढवण्याचे दृष्टीने सन 2022-23 करिता 02/04/2022 पासून शाळा प्रवेश अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानअंतर्गत शासकीय शाळेच्या 10 ते 20 किमी चे परिसरात शाळा व्यवस्थापन समिती सदस्य असून परिसरातील सरपंच,पोलीस पाटील,ग्रा.पं.सदस्य,अंगणवाडी शिक्षिका,बचत गट,युवा मंडळ यांचे सहकार्याने शासकीय आश्रम शाळेत विद्यार्थी संख्या वाढवण्यात यावी असे सांगण्यात आले.

शाळा प्रवेश अभियान सभेच्या प्रसंगी:-
मा.एम.एन.आकुलवार सर मुख्याध्यापक शा.आ.शाळा चिंधीचक,मा.जगदीश सडमाके भाजपा तालुका महामंत्री नागभीड,सौ.सुष्माताई खामदेवे पं.स.सदस्य नागभीड,छगन कोलते सरपंच किटाळी बोर.,उमाजी खोब्रागडे सरपंच गोविंदपूर,वैशाली गायधने सरपंच जनकापूर,प्रदीप समर्थ उपसरपंच चिंधीचक,प्रदीप धारणे पो.पा.चिंधीमाल,माधुरीताई दडमल अंगणवाडी सेविका,डी.पी.सहारे सर तसेच शासकीय माध्य.आश्रमशाळा चिंधीचक येथील शिक्षकवृंद तथा चतुर्थ कर्मचारी वृंद,परिसरातील प्रतिष्ठित गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here