वाडी शेवाळे येथील
सुकळेश्वर येथे महादेव हनुमान व गणेश मुर्ती
प्राणप्रतिष्ठा महोत्सव सोहळा भव्य स्वरूपात पार पडला.
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा :- आज दिनांक 03/04/2022 वाडी शेवाळे येथिल सुकळे या ओसाड माळरानावर श्री स्वामी योगानंद महाराज यांच्या२५ वर्षाच्या तपश्चर्येने या माळरानावर सनातन हिंदू धर्माची भगवी पताका डौलाने फडकली.
या वेळी वाडी शेवाळे,निंभोरी तांडा,मोंढाळा ख.देवळा,सातगाव,
सार्वे – पिंप्री शिंदाड,पिंपळगाव,डोंगरगाव, वानेगाव,राजुरी पंचक्रोशीतील हजारो भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. 3 दिवसां चा हा भक्ती सोहळा पार पडला या वेळी ओंकारेश्वर त्रयंबकेश्वर काशी आळंदी वेरूळ या तिर्थ क्षेत्रातील शेकडो साधु गण याचा पदस्पर्ष व दिव्य आश्या वानीने सर्व भक्तगण मंत्रमुग्ध झाले. या वेळी महामंडलेश्वर स्वामी हंसानंद जी महाराज यांच्या प्रवचनाने व दर्शनाने सर्व भक्तगण तृप्त झाले. या 3 दिवसा मध्ये मोठ्या मंत्र उच्चाराने सुकळेश्वर भुमी पावन झाली.
आज शेवटच्या दिवशी ह.भ.प. पंढरिनाथ महाराज
शिऊर यांचे जोरदार किर्तन झाले व नंतर हजारो
भक्त गणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या वेळी
तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील जि.प. सदस्य मधु भाऊ काटे यांची उपस्थिती लक्षविधी होती आलेल्या प्रतिष्ठित मंडळीचा सत्कार समारोह मानचिन्ह व श्रीफळ देऊन करण्यात आला. या वेळी श्री फौजी बाबा यांनी आपल्या कार्याचा प्रवास मनोगताद्वारे व्यक्त केला. या वेळी शेवाळे गावचे सरपंच श्री योगेश पाटील वाडी सरपंच श्री नंदू पाटील , श्री दिलीप पाटील
श्री तुषार पाटील पत्रकार सुनिल पाटील, रावीआप्पा पांडे,श्रीकांत पांडे , अनिल पाटील ,भगवान पांडे, dr. शेखर पाटील, सोपान ठोबरे,रमेश नाना,गणेश गव्हांडे व शेकडो स्वयं सेवक तसेच ग्रामस्त मंडळी यांनी खुप मोठे योगदान दिले.
आलेल्या सर्व साधु संतांचे आदरतिथ्य सरपंच श्री योगेश पाटील यांनी केले. …