नागभीड युवासेना आणि शिवसेना यांच्या वतीने थाळी वाजवा आंदोलन

नागभीड युवासेना आणि शिवसेना यांच्या वतीने थाळी वाजवा आंदोलन

नागभीड युवासेना आणि शिवसेना यांच्या वतीने थाळी वाजवा आंदोलन

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड : -केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे,रोजच पेट्रोल डिझेलचे वाढते दर, घरगुती सिलेंडर आणि इतर वस्तूंचे वाढलेलं भाव त्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोसळले आहे तद्वतच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे,
केंद्र सरकारच्या तुघलकी कारभाराविरोधात, युवसेनाप्रमुख, पर्यटनमंत्री मा. आदित्यसाहेब ठाकरे यांचे आदेशाने, व मा. वरूनजी सरदेसाई यांच्या सूचनेनुसार, मा. प्रशांतदादा कदम जिल्हा संपर्क प्रमुख,मा. नित्यानंद त्रिपाठी युवासेना जिल्हा विस्तारक, मा. आसिफजी बागवान विधानसभा संपर्क प्रमुख, मा. मुकेशजी जीवतोडे शिवसेना जिल्हा प्रमुख, मा. हर्षलभाऊ शिंदे युवासेना जिल्हा प्रमुख, भोजराजभाऊ ज्ञानबोनवार तालुका प्रमुख यांचे मार्गदर्शनात, आणि अमृतभाऊ नखाते उपजिल्हा प्रमुख यांचे उपस्थितीत, नाझीम शेख युवासेना समन्वयक, मनोज लडके उप तालुका प्रमुख यांचे नेतृत्वात इंधन दरवाढी विरोधात,आज दिनांक 3 एप्रिल, रविवारला सकाळी 10:30 वाजता, नागभीड टी पॉईंट येथे थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले या आंदोलनात, सुनील बोरकर युवासेना शहर प्रमुख, बंडू पांडव उप तालुका प्रमुख, अमित अमृतकर विभाग प्रमुख, मुरली कोसरे, संतोष बुरबांधे, गिरीश नवघडे विभाग प्रमुख, मयूर वंजारी, पंकज कोरडे, सचिन पांडव, अनिल आटमांडे, अनिकेत कायरकर, अंकुश मांढरे, गौरव जीवतोडे, मंगेश मांढरे, पंकज मांढरे, सलमान शेख, संजय नागदेवे, मयूर जीवतोडे, कल्पेश कामडी, अजय पाथोडे, अमोल जनबंधु इत्यादी शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.