सुजात यांनी राजपुत्र अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवायचं आव्हान दिले आहे.
विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. – 9768545422
मुंबई : काल मुंबईत झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढी पाडवा मेळाव्यात शिवाजी पार्कवरील मशिदीवरील भोंग्या विरोधी विधानामुळे राजकारण सुरू झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबडेकर यांनी देखील याचा समाचार घेतला आहे. सुजात यांनी राजपुत्र अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवायचं आव्हान दिले आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाविरोधात वक्तव्य केले होते. त्या भोंग्याविरोधात हनुमान चालिसा लावा, असे आवाहन ठाकरे यांनी मनसैनिकांना केले होते. त्याचा आधार घेत सुजात आंबडेकरांनी हनुमान चालिसा म्हणायचे आव्हान अमित ठाकरेंना केले आहे.
वंचित बहुजन आघाडीने मुंबईतील कुर्ल्यात बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला संबोधताना सुजात आंबेडकर म्हणाले,”माझं राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्ण पाठिंबा आहे. फक्त तिकडे अमित ठाकरेंना ‘हनुमान चालिसा’ म्हणायला लावा. मला तिकडे एकही बहुजन तरुण नको.”
हे आपण वाचलंत का?
- महाराष्ट्रातील उल्का आणि अंतराळातील कचरा
- भारत माझा देश आहे , इंडिया तुमचा देश आहे
- समाजाच्या प्रगतीची केंद्र बनलेल्या आदर्श बुद्धविहारांचा “शोध आदर्श बुद्धविहारांचा” या मीडियावार्ताच्या उपक्रमाद्वारे होणार सन्मान
आंबडेकर पुढे म्हणाले,’माझी राजसाहेबांना विनंती आहे की, तुम्ही शरद पवारांची मुलाखत घ्या किंवा तुमचा पक्ष भाड्यानं लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा. पण तुमचा पक्ष हिंदू-मुस्लिम दंगलीवर उभा करू नका”, असंही सुजात आंबेडकर म्हणाले. आंबेडकरांच्या या प्रतिक्रियेवर मनसेकडून काय प्रतिक्रिया येणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे