ट्रक अपघातात शिक्षक ठार
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909
सिंदेवाही :- सिंदेवाही नागपूर राज्यमार्गावरील शहरातील महाजन इंडेण्ड गॅस जवळील मार्गावर ट्रक व दुचाकी अपघातात शिक्षक ठार तर पत्नी गंभीर झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की जिल्हा परिषद शाळा गुंजेवाही येथे कार्यरत असलेले शिक्षक प्रेमकुमार खोब्रागडे व त्याची पत्नी देवांगणी हे दुचाकीने जात असताना मागून येणाऱ्या ट्रक मध्ये सापडून प्रेमकुमार खोब्रागडे (54)हे ठार झाले तर त्याची पत्नी जखमी झाल्या.
प्रेम कुमार खोब्रागडे हे जिल्हा परिषद हायस्कूल गुंजेवाही येथे शिक्षक असुन ते विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. ते बहुजन चळवळीचे अग्रणी नेतृत्व, तसेच आंबेडकरी विचारवंत, उच्च विद्याविभूषित तसेच पी एचडी धारक असुन ते उत्तम नाटक लेखक तसेच उत्तम वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. अचानक झालेल्या निधनाने बहुजन समाजाचे तसेच आंबेडकरी विचारवंताचे व नाटक श्रोत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
सिंदेवाही नागपूर राज्यमार्गावरील सुरू असलेल्या रोडच्या कामामुळे एका शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला असल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे या अगोदर सुद्धा अनेक छोटे मोठे अपघात या मार्गावर घडले आहे.
सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड याच्या मार्गदर्शनात असुन पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले हे करीत असुन ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.